धक्कादायक : 89 चेंडूंत द्विशतक झळकावणाऱ्या खेळाडूवर सहा वर्षांची बंदी 

पाकिस्तानच्या कामरान अकमल याच्यानंतर आणखी एका खेळाडूवर बंदीची कारवाई करण्यात आली आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2020 09:56 AM2020-05-11T09:56:54+5:302020-05-11T09:57:53+5:30

whatsapp join usJoin us
Afghanistan’s Shafiqullah Shafiq handed six-year ban svg | धक्कादायक : 89 चेंडूंत द्विशतक झळकावणाऱ्या खेळाडूवर सहा वर्षांची बंदी 

धक्कादायक : 89 चेंडूंत द्विशतक झळकावणाऱ्या खेळाडूवर सहा वर्षांची बंदी 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

पाकिस्तानच्या कामरान अकमल याच्यानंतर आणखी एका खेळाडूवर बंदीची कारवाई करण्यात आली आहे. अकमलवर तीन वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. आता अफगाणिस्तानचा यष्टिरक्षक शफिकउल्लाह शफिक याने भ्रष्टाचार विरोधी नियमांचं उल्लंघन केलं आणि त्यामुळे त्याच्यावर सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये सहा वर्षांची बंदी घालण्यात आली. 30 वर्षीय शफिकनं अफगाणिस्तान प्रीमिअर लीगच्या ( 2018) पहिल्या मोसमात संशयास्पद हालचाली केल्या. शिवाय त्यानं बांगलादेश प्रीमिअर लीगमध्ये सहकाऱ्यांनाही त्यासाठी प्रोत्साहीत केल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे.

बांगलादेश प्रीमिअर लीगमध्ये सिलहत थंडर संघाकडून त्यानं तीन सामन्यांत 18 धावा केल्या. नांघरहर येथील शफिकनं त्याच्यावर लावलेल्या चार आरोप कबूल केले आहेत. 2.1.1 कलमांतर्गत त्याच्यावर मॅच फिक्सिंग किंवा इतरांना त्यासाठी प्रोसाहन करण्याचा आरोप ठेवल्यात आला आहे.  2.1.3कलमांतर्गत त्याच्यावर लाच घेण्याचा आरोपही आहे. याशिवाय तो 2.1.4 आणि 2.4.4 कलमांतर्गत दोषी आढळला आहे. ''क्रिकेटमध्ये बेकायदेशीर कृत्य करण्याचा डोक्यात विचार सुरू असलेल्या खेळाडूंसाठी हा धोक्याचा इशारा आहे,''असे मत अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाचे भ्रष्टाचारी विरोधी पथकाचे वरिष्ठ अधिकारी सय्यद अन्वर शाह कुरैशी यांनी व्यक्त केलं.   


शफिकनं 2009मध्ये नेदरलँड्सविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. सहा वर्षांच्या बंदीमुळे त्याची कारकिर्द संपुष्टात आल्याची चर्चा सुरू आहे. बंदी पूर्ण झाल्यानंतर तो 37 वर्षांचा होईल. शफिकनं अफगाणिस्तानकडून 24 वन डे आणि 46 ट्वेंटी-20 सामन्यांत अनुक्रमे 430 व 46 धावा केल्या आहेत. पण, तो चर्चेत आला तो ट्वेंटी-20 क्रिकेटमधील द्विशतकानं... नानगढ चॅम्पियन्स ट्रॉफी या स्थानिक ट्वेंटी-20 स्पर्धेत 2018मध्ये त्यानं 89 चेंडूंत द्विशतक झळकावले होते. प्रथम श्रेणी क्रिकेटमधील हे सर्वात जलद द्विशतक आहे.

 

Web Title: Afghanistan’s Shafiqullah Shafiq handed six-year ban svg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.