ऑस्ट्रेलिया दौऱ्यात कसोटी मालिकेत भारतीय संघानं ऐतिहासिक विजयाची नोंद केल्यानंतर भारतीय संघाचा सदस्य असलेल्या हनुमा विहारी यानं एक पडद्यामागची त्याची एक प्रेरणादायी कहाणी सांगितलं आहे.
सिडनी कसोटी भारतीय संघ गमावण्याच्या उंबरठ्यावर असताना हनुमा विहारीनं दुखापतग्रस्त असतानाही खिंड लढवली. या सामन्यानंतर माजी क्रिकेटपटू आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या अध्यक्षपदी असणाऱ्या राहुल द्रविडने आपल्याला खास मेसेज केला होता, असं हनुमा विहारीनं सांगितलं आहे.
धोनी ज्ञानाचा महासागर, दबावात कसं खेळायचं हे त्याच्याकडून शिकलो: शार्दुल ठाकूर
सिडनी कसोटीत भारतीय संघाचा पराभव टाळण्यासाठी हनुमा विहारी यानं आर.अश्विनच्या साथीनं खेळपट्टीवर टिच्चून फलंदाजी केली होती. दोघांनीही तब्बल ४२ षटकं खेळून काढली होती आणि मालिका तिसऱ्या कसोटीनंतर १-१ अशी बरोबरीत राहिली.
राहुलने हनुमा विहारीला कौतुकाचा मेसेज केला होता. "सिडनी कसोटीनंतर राहुल सरांनी मला मेसेज केला होता. त्यांनी मला तू खूप छान खेळलास. खूप चांगलं काम केलं आहेस, असा मेसेज पाठवला होता. ते असे प्रांजळ आहेत म्हणून मला त्यांचा खूप आदर वाटतो", असं हनुमा विहारी एका मुलाखतीत म्हणाला.
८ वर्षांपासून एकही विजेतेपद नाही, तरीही कोहली कॅप्टन का?, गंभीरचा निशाणा
राहुल द्रविड यांनी आजवर अनेक खेळाडूंना रणजी चषक आणि भारतीय संघातील स्थान यामधील अंतर कमी करण्यासाठी मदत केल्याचंही विहारी म्हणाला. राहुल सर भारतीय अ संघाच्या प्रशिक्षकपदी असताना त्यांच्या अमूल्य मार्गदर्शनामुळे एकाग्रतेने क्रिकेट कसं खेळावं हे युवा खेळाडूंना शिकायला मिळत असल्याचंही विहारीनं सांगितलं.
भारतीय संघातील आजचे खेळाडू हे राहुल सरांचेच शिष्य
“ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय संघातून खेळणारे सिराज, शुभमन, मयांक आणि अनेक खेळाडू हे भारत अ संघासाठी खेळले आहेत. मागील तीन ते चार वर्षात आम्ही भारत अ संघाकडून खेळताना अनेक दौरे केले. त्यावेळी राहुल द्रविडच प्रशिक्षक होते. याआधी भारत अ संघाने एवढे दौरे केल्याचं मला वाटत नाही. त्यामुळेच रणजी चषक आणि भारतीय संघातील अंतर कमी होण्यास मदत झाली. आम्ही खूप वेगाने प्रगती करत संघात जागा मिळवली. यामुळेच आज आम्हाला कसोटीत खेळण्याची संधी मिळाली आणि आम्ही इतर कोणत्याही खेळाडूपेक्षा कमी नाही. राहुल सरांमुळेच हे शक्य झालं आहे,” असं हनुमाने मुलाखतीमध्ये सांगितलं.
Web Title: after the Sydney Test Rahul sir text me says Hanuma Vihari
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.