अजिंक्य रहाणे Leicestershire साठी वन डे खेळणार; दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूला केलं रिप्लेस

३६ वर्षीय खेळाडूने दक्षिण आफ्रिकेच्या Wiaan Mulder ला रिप्लेस केले आहे. वियान मुल्डर हा  ऑगस्टमध्ये कॅरिबियन दौऱ्यासाठी दक्षिण आफ्रिकेच्या संघाचा भाग आहे.  

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2024 05:56 PM2024-06-27T17:56:55+5:302024-06-27T17:58:25+5:30

whatsapp join usJoin us
Ajinkya Rahane signs up for Leicestershire to play One-Day Cup, replaces Wiaan Mulder | अजिंक्य रहाणे Leicestershire साठी वन डे खेळणार; दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूला केलं रिप्लेस

अजिंक्य रहाणे Leicestershire साठी वन डे खेळणार; दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूला केलं रिप्लेस

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारतीय संघाबाहेर असलेला माजी कर्णधार अजिंक्य रहाणे ( Ajinkya Rahane)  आगामी वन डे कप स्पर्धेत लिसेस्टरशायर कौंटी क्रिकेट क्लबकडून खेळणार आहे.  


“लिसेस्टरशायरला येण्याची आणखी एक संधी मिळाल्याने मी खरोखरच उत्साहित आहे. क्लॉड हेंडरसन आणि अल्फोन्सो थॉमस यांच्याशी माझी चांगली बाँडिंग झाली आहे. मी समर सिझनमध्ये क्लबसाठी खेळण्यास उत्सुक आहे. या संघाची मागील वर्षातील कामगिरी पाहिली आणि मी खूप प्रभावित झालो आहे.  मी क्रिकेटचा आनंद लुटू शकेन आणि या हंगामात क्लबसाठी अधिक यश मिळवू शकेन, अशी मला आशा आहे, ” असे अजिंक्य रहाणे वन-डे कप स्पर्धेच्या गतविजेत्या संघात सहभागी झाल्यावर म्हणाला. 

३६ वर्षीय खेळाडूने दक्षिण आफ्रिकेच्या Wiaan Mulder ला रिप्लेस केले आहे. वियान मुल्डर हा  ऑगस्टमध्ये कॅरिबियन दौऱ्यासाठी दक्षिण आफ्रिकेच्या संघाचा भाग आहे.  रहाणेने सर्व फॉरमॅटमध्ये २६ हजाराहून अधिक धावा केल्या आहेत, ज्यामध्ये ५१ शतकांचा समावेश आहे. २०११ मध्ये पदार्पण केल्यापासून त्याने भारतासाठी १९५ सामन्यांत प्रतिनिधित्व केले आणि ८ हजाराहून अधिक धावा केल्या आहेत. २०१६ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध १८८ धावांची खेळी ही त्याची कसोटीतील सर्वोत्तम धावसंख्या आहे.  
 

Web Title: Ajinkya Rahane signs up for Leicestershire to play One-Day Cup, replaces Wiaan Mulder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.