भारतीय चाहत्यांना प्रतीक्षा आहे ती इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल 2020) 13व्या मोसमाची. पुढील महिन्याच्या 19 तारखेपासून आयपीएलचा थरार रंगणार आहे. त्यामुळे सर्वांची उत्सुकता वाढत चालली आहे. यंदाचे आयपीएल संयुक्त अरब अमिराती ( यूएई) येथे होणार असल्यानं खेळाडूंची कोरोना चाचणी, जैव सुरक्षितता वातावरण, आदी सर्व विषयांवर चर्चा सुरू आहे. आयपीएलला सुरुवात होण्यापूर्वी पुढील आठवड्यात आणखी एका लीगला सुरुवात होणार आहे आणि त्यासाठी 162 खेळाडू व अधिकाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्याचा रिपोर्ट समोर आला असून आता सर्व खेळाडू व अधिकारी क्वारंटाईन झाले आहेत.
कॅरेबियन प्रीमिअर लीग ( CPL) ला 18 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. त्यासाठी खेळाडू, अधिकारी आणि आयोजक आदी त्रिनिदाद अँड टोबॅगो येथे दाखल झाले आहेत. सर्व 162 सदस्यांची कोरोना चाचणी करण्यात आली असून सर्वांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. आता सर्वांना हॉटेलमध्ये 14 दिवसांसाठी क्वारंटाईन करण्यात आले आहे. या कालावधीत त्यांची कोरोना चाचणी करण्यात येईल. यात एकही सदस्यात कोरोनाची लक्षण दिसल्यास, त्याला तातडीनं हॉटेलमधून हलवण्यात येईल. पण, आतापर्यंत सर्व सदस्य कोरोना मुक्त आहेत.
18 ऑगस्टपासून या लीगला सुरू होणार असून 33 सामने खेळवण्यात येणार आहेत. टॉरूबा येथील ब्रायन लारा क्रिकेट अकादमीत 23 आणि पोर्ट ऑफ स्पेनच्या क्वीन्स पार्क ओव्हल मैदानावर 10 सामने खेळवण्यात येणार आहेत. स्टेडियममध्ये प्रेक्षकांना प्रवेश दिला जाणार नाही. ब्रायन लारा क्रिकेट अकादमीत उपांत्य फेरी आणि अंतिम सामना होणार आहे. 10 सप्टेंबरला लीगचा अंतिम सामना होईल. लीग आयोजक संचालक म्हणाले,''सर्व सदस्यांच्या सुरक्षिततेची काळजी घेतली जात आहे. सर्व सदस्यांचे आरोग्य, याला आम्ही प्राधान्य दिले आहे.''
स्पर्धेचे वेळापत्रक...
Web Title: All 162 players, officials in Caribbean Premier League 2020 tests negative, now under quarantine
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.