इंडियन प्रीमिअर लीगच्या ( Indian Premier League 2021) १४व्या पर्वासाठी येत्या १४ फेब्रुवारीला मिनी-ऑक्शन ( IPL 2021 Mini-Auction) होणार आहे. महान फलंदाज सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन ( Arjun Tendulkar) यानंही लिलावासाठी नाव नोंदवल्यानं त्याला कोणती फ्रँचायझी घेते, याची सर्वांना उत्सुकता आहे. लिलावापूर्वी अर्जुन तेंडुलकरनंही अष्टपैलू कामगिरी करून दाखवताना फ्रँचायझींचे लक्ष वेधले आहे. मुंबईत सुरू असलेल्या पोलिस ढाल क्रिकेट स्पर्धेत ( Police Shield Cricket Tournament ) अर्जुन एमआयजी क्रिकेट क्लबचे प्रतिनिधित्व करत आहे. त्याच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर एमआयजी संघानं मोठा विजय मिळवला. IPL 2021 Acution list : अर्जुन तेंडुलकरच्या नावाला होकार, पण एस श्रीसंत याला नकार; जाणून घ्या नेमका प्रकार!
रविवारी झालेल्या या सामन्यात अर्जुननं २६ चेंडूंत ७७ धावा चोपल्या आणि त्यात ८ षटकार व ५ चौकारांचा समावेश होता. २१ वर्षीय अर्जुननं गोलंदाजीतही कमाल दाखवली आणि ४० धावा देत ३ विकेट्सही घेतल्या. ४५-४५ षटकांच्या या सामन्यात एमआयजी क्लबनं इस्लाम जिमखान्यावर विजय मिळवला. नाणेफेक जिंकून एमआयजी क्लबने प्रथम फलंदाजीची निर्णय घेतला. कर्णधार केव्हीन डी'अल्मेडानं ९३ चेंडूंत ९६ धावा चोपल्या, तर प्रग्नेश कानपिल्लेवर यानं खणखणीत शतक झळकावलं. अर्जुननं स्फोटक फलंदाजी करताना संघाला ४५ षटकांत ७ बाद ३८५ धावांपर्यंत मजल मारून दिली. प्रत्युत्तरात इस्लाम जिमखाना संघाला ४१.४ षटकांत सर्वबाद १९१ धावा करता आल्या.
२९२ खेळाडू, ६१ जागा अन् आयपीएल फ्रँचायझींकडून १९६.६ कोटींचा पाऊस
इंडियन प्रीमिअर लीगच्या ( Indian Premier League 2021) १४व्या पर्वासाठी होणाऱ्या ऑक्शनसाठीची अंतिम २९२ खेळाडूंची यादी जाहीर केली. आता आयपीएल २०२१च्या मिनी ऑक्शनसाठीच्या ६१ रिक्त जागांसाठी २९२ खेळाडू शर्यतीत आहेत आणि फ्रँचायझीच्या पर्समध्ये १९६.६ कोटी आहेत. ( IPL 2021 Player Auction list – 292 cricketers, 61 Spots, 196.6 Cr). चेन्नईत १८ फेब्रुवारीला हा ऑक्शन होणार आहे. आयपीएल २०२१ मिनी ऑक्शनसाठी ( IPL 2021 Mini-Auction) १११४ खेळाडूंनी नाव नोंदवली होती, परंतु ८ फ्रंचायझींनी यापैकी २९२ नावांची अंतिम यादी BCCIकडे सोपवली. अर्जुन
Web Title: Arjun Tendulkar Hits 26-Ball 77, Takes 3 Wickets in Police Shield Tournament
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.