इतिहास घडला; बांगलादेशनं आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० मालिकेत ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय मिळवला!

BAN vs AUS 3rd T20I बांगलादेशनं पहिल्या सामन्यात १३१ धावांचा यशस्वी बचाव केला होता, तर दुसऱ्या सामन्यात १२२ धावांचे लक्ष्य सहज पार केले होते.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2021 10:32 PM2021-08-06T22:32:34+5:302021-08-06T22:41:07+5:30

whatsapp join usJoin us
BANGLADESH WIN THEIR FIRST SERIES AGAINST AUSTRALIA IN ANY FORMAT, They defeat the visitors by 10 runs and go 3-0 up in the T20I series | इतिहास घडला; बांगलादेशनं आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० मालिकेत ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय मिळवला!

इतिहास घडला; बांगलादेशनं आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० मालिकेत ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय मिळवला!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

BAN vs AUS, 3rd T20I : पाच सामन्यांच्या मालिकेत पिछाडीवर पडलेल्या ऑस्ट्रेलियन संघानं तिसऱ्या सामन्यात संघात बदल करताना बांगलादेशला ९ बाद १२७ धावांवर समाधान मानण्यास भाग पाडले. पण, बांगलादेशच्या गोलंदाजांनी कांगारूंना शरणागती पत्करण्यास भाग पाडले. ऑस्ट्रेलियाला १२८ धावांचे लक्ष्यही पार करता आले नाही. ( HISTORY! Bangladesh have registered their first ever series win against Australia in international cricket) 

बांगलादेशच्या सलामीवीरांना अपयश आल्यानंतर शाकिब अल हसन आणि महमुदुल्लाह यांनी संघाचा डाव सारवला. शाकिब २६ धावांवर बाद झाला. महमुदुल्लाहनं ५२ धावांची खेळी केली. अफिप होसैननं १९, तर नुरूल सहननं ११ धावा केल्या. जोश हेझलवूड व अॅडम झम्पा यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. एलिसनं २०व्या षटकाच्या अखेरच्या तीन चेंडूंवर महमुदुल्लाह, मुस्ताफिजूर रहमान व महेदी हसन यांना बाद केले अन् विक्रम नोंदवला. ऑस्ट्रेलियाकडून ट्वेंटी-२० हॅटट्रिक घेणारा तो तिसरा गोलंदाज ठरला. यापूर्वी ब्रेट ली ( वि. बांगलादेश, २००७) आणि अॅश्टन अॅगर ( वि. द. आफ्रिका, २०२०) यांनी अशी कामगिरी केली आहे. 

लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाकडून बेन मॅकडेमोट ( ३५), मिचेल मार्श ( ५१) व अॅलेक्स करी ( २०*) वगळता अन्य फलंदाजांनी नांग्या टाकल्या. बांगलादेशनं त्यांना २० षटकांत ४ बाद ११७ धावांवर रोखून १० धावांनी सामना जिंकला. या विजयासह बांगलादेशनं पाच सामन्यांच्या मालिकेत ३-० अशी विजयी आघाडी घेतली. बांगालदेशनं ऑस्ट्रेलियावर मिळवलेला हा पहिला मालिका विजय आहे ( Bangladesh Won 3rd T20I by 10 Runs against Australia & Bangladesh lead the five-match series 3-0. First-ever bilateral win for Bangladesh against Australia) 


बांगलादेशनं पहिल्या सामन्यात १३१ धावांचा यशस्वी बचाव केला होता, तर दुसऱ्या सामन्यात १२२ धावांचे लक्ष्य सहज पार केले होते. ऑस्ट्रेलियाचा हा सलग पाचवा ट्वेंटी-२० मालिका पराभव आहे. या मालिकेआधी वेस्ट इंडिज, न्यूझीलंड, भारत आणि इंग्लंड यांनी ऑस्ट्रेलियाला पराभूत केले.  बांगलादेशचा हा सलग सातवा ट्वेंटी-२० सामन्यातील विजय आहे (   This is the 7th consecutive T20I win at home for ) 

Web Title: BANGLADESH WIN THEIR FIRST SERIES AGAINST AUSTRALIA IN ANY FORMAT, They defeat the visitors by 10 runs and go 3-0 up in the T20I series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.