WTC Final : जागतिक कसोटी अजिंक्यपद फायनलसाठी टीम इंडियाचा संघ जाहीर; हार्दिक पांड्या, पृथ्वी शॉ यांना संधी नाही

१४वी इंडियन प्रीमिअर लीग ( IPL 2021) आता अनिश्चित काळासाठी स्थगित केल्यानंतर भारतीय खेळाडूंचा संपूर्ण फोकस आंतरराष्ट्रीय क्रिकेटवर केंद्रीत केला आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2021 06:09 PM2021-05-07T18:09:40+5:302021-05-07T18:22:17+5:30

whatsapp join usJoin us
BCCI announced India's squad for World Test Championship's final and England Test series | WTC Final : जागतिक कसोटी अजिंक्यपद फायनलसाठी टीम इंडियाचा संघ जाहीर; हार्दिक पांड्या, पृथ्वी शॉ यांना संधी नाही

WTC Final : जागतिक कसोटी अजिंक्यपद फायनलसाठी टीम इंडियाचा संघ जाहीर; हार्दिक पांड्या, पृथ्वी शॉ यांना संधी नाही

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

१४वी इंडियन प्रीमिअर लीग ( IPL 2021) आता अनिश्चित काळासाठी स्थगित केल्यानंतर भारतीय खेळाडूंचा संपूर्ण फोकस आंतरराष्ट्रीय क्रिकेटवर केंद्रीत केला आहे. भारतीय संघ पुढील महिन्यापासून इंग्लंडच्या दौऱ्यावर आहे आणि कोरोनाचे नियम व १४ दिवसांचा क्वारंटाईन लक्षात घेता जूनच्या पहिल्याच आठवड्यात भारतीय खेळाडू इंग्लंडसाठी रवाना होतील. भारतीय संघ १८ ते २३ जून या कालावधीत जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये न्यूझीलंडचा सामना करेल, त्यानंतर इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका. चार महिन्यांच्या या दौऱ्यासाठी बीसीसीआयनं आज टीम इंडियाची घोषणा केली.  (team India likely to depart for England on 2nd June.) 

कोरोना परिस्थितीत इंग्लंडमध्ये सराव सामन्यांचे आयोजन होणं, अवघड आहे. त्यामुळे जम्बो संघ पाठवून त्यातून दोन संघ तयार करून टीम इंडियाला सराव सामनेही खेळता येतील. हार्दिक पांड्या अद्यापही पूर्णपणे तंदुरुस्त झाला नसल्यानं तो गोलंदाजी करत नाही. त्यामुळे त्याची निवड झालेली नाही. पण, पृथ्वी शॉ याची निवड न होणे, आश्चर्यकारक आहे. पृथ्वीनं विजय हजारे ट्रॉफीच्या एका पर्वात ८००+ धावा करून इतिहास घडवला होता, शिवाय आयपीएलमध्येही त्याची बॅट चांगली तळपली होती. तरीही त्याला निवडण्यात आले नाही. 

हनुमा विहारी, रवींद्र जडेजा व मोहम्मद शमी यांचे टी इंडियात पुनरागमन झाले आहे. ( Hanuma Vihari, Ravindra Jadeja and Mohammed Shami return to the India squad). हार्दिक व पृथ्वी यांच्यासह भुवनेश्वर कुमार व कुलदीप यादव यांचीही निवड झालेली नाही.  
 

भारतीय संघ - विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, शुबमन गिल, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रिषभ पंत, आर अश्वि, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दूल ठाकूर, उमेश यादव ( India's squad: Virat Kohli (C), Ajinkya Rahane (VC), Rohit Sharma, Gill, Mayank, Cheteshwar Pujara, H. Vihari, Rishabh (WK), R. Ashwin, R. Jadeja, Axar Patel, Washington Sundar, Bumrah, Ishant, Shami, Siraj, Shardul, Umesh. )
लोकेश राहुल व वृद्धीमान सहा यांची निवड फिटनेस टेस्टनंतर ( KL Rahul & Saha (WK) subject to fitness clearance.)


राखीव खेळाडू - अभिमन्य इस्वरन, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान, अर्झान नागवास्वाला. ( Standby players: Abhimanyu Easwaran, Prasidh Krishna, Avesh Khan, Arzan Nagwaswalla)

 
 
टीम इंडियाचा इंग्लंड दौरा
१८ ते २३ जून - भारत विरुद्ध न्यूझीलंड ( जागतिक कसोटी अजिंक्यपद फायनल)

भारत वि. इंग्लंड कसोटी मालिका
४ ते ८ ऑगस्ट - पहिली कसोटी
१२ ते १६ ऑगस्ट - दुसरी कसोटी
२५ ते २९ ऑगस्ट - तिसरी कसोटी
२ ते ६ सप्टेंबर - चौथी कसोटी
१० ते १४ सप्टेंबर - पाचवी कसोटी
 

Web Title: BCCI announced India's squad for World Test Championship's final and England Test series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.