Asia Cup स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा; पंत-हार्दिकसह या १३ वर्षीय खेळाडूला संधी

या दिवशी रंगणार भारत-पाक यांच्यातील हायहोल्टेज सामना

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2024 12:29 PM2024-11-14T12:29:55+5:302024-11-14T12:31:39+5:30

whatsapp join usJoin us
BCCI announces Hardik-Pant-loaded India's 15-member squad for Asia Cup 2024 Know About Ind vs PAK Match On This Date | Asia Cup स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा; पंत-हार्दिकसह या १३ वर्षीय खेळाडूला संधी

Asia Cup स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा; पंत-हार्दिकसह या १३ वर्षीय खेळाडूला संधी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) कनिष्ठ निवड समितीने आगामी ACC पुरुष U19 आशिया चषक २०२४  साठी भारताच्या 15 सदस्यीय U19 संघाची घोषणा केली आहे. ही स्पर्धा  संयुक्त अरब अमिराती येथे पार पडणार असून मोहम्मद अमान १९ वर्षाखालील भारतीय संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे.

आशिया चषक स्पर्धेत १९ वर्षाखालील भारतीय संघाचा दबदबा

१९ वर्षाखालील भारतीय संघाचा या स्पर्धेत दबदबा राहिला आहे. आठ वेळा भारतीय संघाने ही स्पर्धा जिंकलीये. आता पुन्हा नव्या नवव्यांदा ही ट्रॉफी पटवण्यासाठी तगडी संघ बांधणी करण्यात आलीये. मोहम्मद अमानच्या नेतृत्वाखालील संघात पंत आणि हार्दिक यांच्यासह १३ वर्षीय खेळाडूलाही संधी देण्यात आलीये. 

भारत-पाक एकाच गटात

भारतीय संघासोबत 'अ' गटात पाकिस्तान, जपान  आणि युएई या संघाचा समावेश आहे. दुसरीकडे 'ब' गटात अफगाणिस्तान, बांगलादेश, नेपाळ आणि श्रीलंका हे संग आहे. भारतीय संघ २६ नोव्हेंबरला शारजाहच्या मैदानात बांगालेश विरुद्धच्या सराव सामन्याने या मोहिमेला सुरुवात करेल.  

कधी रंगणार भारत-पाक सामना? असं आहे भारतीय संघाच वेळापत्रक

मुख्य फेरीत भारतीय संघ ३० नोव्हेबरला पाकिस्तान विरुद्ध मैदानात उतरणार आहे. हा सामना दुबईच्या मैदानात खेळवण्यात येईल. २ डिसेंबरला भारतीय संघाची दुसरी लढत जपान तर ४ डिसेंबरला भारत विरुद्ध यूएई असा सामना पाहायला मिळेल. हे दोन्ही सामने  शारजाहमध्ये खेळवले जातील.

१९ वर्षाखालील भारतीय संघात या १३ वर्षीय खेळाडूला मिळाली संधी

१९ वर्षाखालील भारतीय संघात १३ वर्षीय वैभव सूर्यवंशीचाही समावेश आहे. या वर्षाच्या सुरुवातीला त्याने चेन्नई येथे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या युवा कसोटी मालिकेत ५८ चेंडूत शतक झळकावून लक्षवेधून घेतले होते. याशिवाय मुंबईकर आयुष म्हात्रे याचाही भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे.

 आशिया चषक स्पर्धेसाठी १९ वर्षाखालील भारतीय संघ:

आयुष म्हात्रे, वैभव सूर्यवंशी,  आंद्रे सिद्धार्थ, मोहं. अमन (कर्णधार), किरण चोरमले (उप कर्णधार), प्रणव पंत, हरवंशसिंग पनगालिया (विकेट किपर बॅटर), अनुराग कवडे (विकेट किपर बॅटर), हार्दिक राज, मो. ईनान, केपी कार्तिकेय, समर्थ नागराज, युधाजित गुहा, चेतन शर्मा, निखिल कुमार

नॉन ट्रॅव्हलिंगमधील राखीव खेळाडू: साहिल पारख, नमन पुष्पक, अनमोलजीत सिंग, प्रणव राघवेंद्र, डी दिपेश

Web Title: BCCI announces Hardik-Pant-loaded India's 15-member squad for Asia Cup 2024 Know About Ind vs PAK Match On This Date

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.