IPL 2021 Remaining Matches : लिंबूटिंबू परदेशी खेळाडूंसोबत BCCI उर्वरित सामने खेळवणार, ICCकडे विनंती करणार!

IPL 2021 Remaining Matches : इंडियन प्रीमिअर लीगच्या १४व्या पर्वातील उर्वरित ३१ सामने ( IPL 2021) यूएईत खेळवण्याचा निर्णय बीसीसीआयनं जाहीर केला अन् क्रिकेट चाहते पुन्हा खुश झालेत. पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2021 10:13 AM2021-05-31T10:13:42+5:302021-05-31T10:15:37+5:30

whatsapp join usJoin us
BCCI will take requests of replacement of players who won't be available for the rescheduled IPL 2021 | IPL 2021 Remaining Matches : लिंबूटिंबू परदेशी खेळाडूंसोबत BCCI उर्वरित सामने खेळवणार, ICCकडे विनंती करणार!

IPL 2021 Remaining Matches : लिंबूटिंबू परदेशी खेळाडूंसोबत BCCI उर्वरित सामने खेळवणार, ICCकडे विनंती करणार!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देआयपीएल २०२१ स्पर्धेचे उर्वरित सामने UAEत होणार असल्याची बीसीसीआयनं केली घोषणाबीसीसीआयन पार केला पहिला अडथळा, पण अन्य गोष्टींबाबत काय?

IPL 2021 Remaining Matches : इंडियन प्रीमिअर लीगच्या १४व्या पर्वातील उर्वरित ३१ सामने ( IPL 2021) यूएईत खेळवण्याचा निर्णय बीसीसीआयनं जाहीर केला अन् क्रिकेट चाहते पुन्हा खुश झाले. पण, बीसीसीआयनं UAEची निवड करून पहिला अडथळा दूर केला आहे. अद्याप त्यांच्यासमोर अनेक आव्हानं आहेत आणि त्यासाठी त्यांनी विविध क्रिकेट बोर्डांशी चर्चा सुरू केली आहे. आयपीएल २०२१चे उर्वरित सामने १८ किंवा १९ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर या कालावधीत खेळवण्याची चर्चा आहे, परंतु अद्याप बीसीसीआयकडून अधिकृत घोषणा झालेली नाही. बीसीसीआयसमोर आणखी एक मोठं आव्हान म्हणजे परदेशी खेळाडूंची उपलब्धता... त्यामुळे बीसीसीआयनं ICCकडे एक खास विनंती केली आहे आणि ती मान्य झाल्यास लिंबूटिंबू परदेशी खेळाडूंसोबत आयपीएल २०२१ पूर्ण झालेली पाहायला मिळेल. IPL 2021 in UAE : फ्रँचायझींनी सुरू केलं सेलिब्रेशन, जाणून घेऊयात पहिल्या टप्प्यातील प्रत्येक संघाची पोझिशन!

सप्टेंबर-ऑक्टोबर या कालावधीत इंग्लंड, न्यूझीलंड व अफगाणिस्तानचे खेळाडू राष्ट्रीय कर्तव्यावर आहेत. त्यात कॅरेबियन प्रीमिअर लीगच्या ( Caribbean Premier League ) पर्वाची घोषणा झाली आहे. त्यामुळे आयपीएल २०२१च्या पहिल्या १० दिवसांत वेस्ट इंडिजच्या खेळाडूंच्या सहभागावरही संकट आलं आहे. भारत-इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिका १४ सप्टेंबरला संपणार आहे आणि त्यानंतर लगेचच आयपीएलच्या उर्वरित सामन्यांना सुरूवात होईल. भारत व इंग्लंडचे खेळाडू थेट लंडनहून यूएईत दाखल होतील. ते एका बायो-बबलमधून येणार असल्यानं त्यांना यूएईत क्वारंटाईन होण्याची गरज नाही. पण, अन्य खेळाडूंच्या बाबतीत हा नियम लागू होणार नाही. कोलकाता, हैदराबाद दुसऱ्या टप्प्यात नेतृत्वबदल करणार; जाणून घ्या नवा कर्णधार कोण असणार!

बीसीसीआय सीपीएलसोबत त्यांच्या वेळापत्रकात बदल करण्याची चर्चा करत आहेत. ती मान्य होईल, अशी शक्यता आहे. त्यामुळे वेस्ट इंडिजचे खेळाडू आयपीएलसाठी उपलब्ध होतील. ऑस्ट्रेलिया व कोलकाता नाईट रायडर्सचा गोलंदाज पॅट कमिन्स यानं आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात खेळणार नसल्याचे जाहीर केल्यानं बीसीसीआयची डोकेदुखी वाढणार आहे. अशात बीसीसीआय परदेशी खेळाडूंच्या रिप्लेसमेंटसाठी आयसीसीकडे विनंती करण्याची शक्यता आहे. जे खेळाडू राष्ट्रीय कर्तव्यावर नाहीत, त्या परदेशी खेळाडूंना घेऊन आयपीएल २०२१पूर्ण करण्याचा प्रयत्न होईल. IPL 2021 Remaining Match : फॅफ ड्यू प्लेसिस, ख्रिस गेल यांनी घेतला महत्त्वाचा निर्णय; CSK, PBKSसह KKRचं वाढलं टेंशन


आयपीएल २०२१ दरम्यान आंतरराष्ट्रीय मालिका

  • इंग्लंड - बांगलादेश दौरा ( ३ वन डे व ३ ट्वेंटी-२०), पाकिस्तानविरुद्धची दोन सामन्याची मालिका 
  • न्यूझीलंड - न्यूझीलंड यूएईत पाकिस्तानविरुद्ध ३ वन डे व ३ ट्वेंटी-२० सामन्यांची मालिका खेळणार 
  • ऑस्ट्रेलिया - श्रीलंकेविरुद्ध ३ वन डे व ३ ट्वेंटी-२० सामन्यांच्या मालिकेचे आयोजन
  • दक्षिण आफ्रिका - नेदरलँड्स यांच्याविरुद्धची मालिका, त्यानंतर काही खेळाडू CPL 2021त खेळणार 

कोणते खेळाडू मुकणार?

  • इंग्लंड - मोईन अली, बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चर, इयॉन मॉर्गन, जोस बटलर, लायम लिव्हिंगस्टोन, सॅम कुरन, टॉम कुरन, ख्रिस वोक्स, जेसन रॉय, सॅम बिलिंग, डेविड मलान, ख्रिस जॉर्डन, जॉनी बेअरस्टो.
  • न्यूझीलंड - केन विलियम्सन, अॅडम मिल्ने, ट्रेंट बोल्ट, मिचेल सँटनर, लॉकी फर्ग्युसन, टीम सेईफर्ट, फिन अॅलन, कायले जेमिन्सन 
  • ऑस्ट्रेलिया - ग्लेन मॅक्सवेल, पॅट कमिन्स, डेव्हिड वॉर्नर, झाय रिचर्डसन, मार्कस स्टॉयनिस, स्टीव स्मिथ, रिले मेरेडीथ, नॅथन कोल्टर नील. केन रिचर्डसन, डॅनिएल सॅम्स, डॅन ख्रिस्टियन, ख्रिस लीन, अँड्य्रू टाय, बेन कटींग, जेसन बेहरेनडॉर्फ, मोईसेस हेन्रीक्स, अॅडन झम्पा.
  • दक्षिण आफ्रिका - क्विंटन डी कॉक, फॅफ ड्यू प्लेसि, कागिसो रबाडा, इम्रान ताहीर, अॅनरिच नॉर्ट्जे, ख्रिस मॉरिस, डेव्हिल मिलर, लुंगी एनगिडी, मार्को जॅन्सेन 
  • बांगलादेश - शाकिब अल हसन, मुस्ताफिजुर रहमाना  
  • वेस्ट इंडिज - किरॉन पोलार्ड, ख्रिस गेल, निकोलस पूरन, आंद्रे रसेल, शिमरोन हेटमायर, सुनील नरीन, फॅबियन अॅलेन, ड्वेन ब्राव्हो, जेसन होल्डर

Web Title: BCCI will take requests of replacement of players who won't be available for the rescheduled IPL 2021

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.