भारतीय संघानं अहमदाबाद कसोटीत ( Ahmedabad Test) इंग्लंडचा दोन दिवसांत पराभव केला. इंग्लंडला पहिल्या डावात ११२ व दुसऱ्या डावात ८१ धावाच करता आल्या. भारतानं पहिल्या डावात १४५ धावा करून ३३ धावांची आघाडी घेतली होती आणि ४९ धावांचं माफक लक्ष्य त्यांनी एकही विकेट न गमावता पार केलं. अक्षर पटेलनं ( Axar Patel) ११ विकेट्स घेतल्या, तर आर अश्विननं ( R Ashwin) ७ बळी टिपले. नरेंद्र मोदी स्टेडियमवर ( Narendra Modi Stadium) टीम इंडियानं विजय मिळवून दहा मोठे विक्रम नोंदवले.
अक्षर पटेलनं अहमदाबाद कसोटीच्या पहिल्या डावात सहा विकेट्स घेतल्या. कसोटी कारकिर्दीतील त्याचा हा दुसराच सामना आहे. यापूर्वी त्यानं चेन्नईतील दुसऱ्या कसोटीतून त्यानं पदार्पण करताना पाच विकेटसह एकूण सात विकेट्स घेत इतिहास रचला होता. अहमदाबाद कसोटीच्या दुसऱ्या डावात त्यानं पहिल्याच षटकाच्या पहिल्याच चेंडूवर विकेट घेतली. ११४ वर्षांनंतर कसोटीतील डावाच्या पहिल्या चेंडूवर विकेट घेणारा आर अश्विननंतर तो दुसरा गोलंदाज ठरला. ICC World Test Championship : इंग्लंडचा पत्ता कट झाला, पण टीम इंडियाचं Final चं तिकीट अजूनही पक्क नाही!
कसोटीच्या पहिल्याच चेंडूवर विकेट घेणारे फिरकी गोलंदाज
बॉबी पील विकेट अॅलेक बॅनेर्मन, १८८८
अल्बर्ट व्होग्लर विकेट टॉम हेयबर्ड, १९०७
आर अश्विन विकेट रोरी बर्न्स, २०२१
अक्षर पटेल विकेट झॅक क्रॅव्ली, २०२१
- इशांत शर्मानं १४ वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत मारला पहिला षटकार
इशांत शर्माचा हा १०० वा कसोटी सामना होता. कपिल देव यांच्यानंतर १०० कसोटी सामना खेळणारा इशांत हा दुसरा जलदगती गोलंदाज आहे. या सामन्यात इशांतनं खणखणीत षटकार खेचला. १४ वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीतील त्याचा हा पहिलाच षटकार ठरला. २००७मध्ये इशांतनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. त्यानं १०० कसोटी, ८० वन डे व १४ ट्वेंटी-२० सामने खेळले आणि त्यात २६७७ चेंडूंचा सामना केला. Virat Kohli : घरच्या मैदानावर आता विराट कोहली 'वाघ'; महेंद्रसिंग धोनीचा विक्रम मोडला
- जो रुटनं गोलंदाजीत दाखवली कमाल
जो रूटनं आजच्या सामन्यात ६.२ षटकांत ८ धावांत ५ विकेट्स घेतल्या. कसोटी क्रिकेटमधील फिरकीपटूनं सर्वात कमी धावांत पाच विकेट्स घेण्याची ही सर्वोत्तम कामगिरी. यापूर्वी १९९२-९३साली टीम मे यानं वेस्ट इंडिजविरुद्ध ९ धावांत ५, तर २००४-०५मध्ये मायकेल क्लार्क यानं भारताविरुद्ध ९ धावांत ६ विकेट्स घेतल्या होत्या. कसोटी क्रिकेटमध्ये कर्णधाराची ही दुसरी सर्वोत्तम कामगिरी ठरली. १९२४मध्ये आर्थर गिलिगन यांनी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ७ धावांत ६ विकेट्स घेतल्या होत्या. रुटनं ( ५/८) वेस्ट इंडिजचे कर्टनी वॉल्श ( ६/१८ वि. न्यूझीलंड, १९९५) यांचा विक्रम मोडला.
- जॉनी बेअरस्टोची निराशाजनक कामगिरी
इंग्लंडचा फलंदाज जॉनी बेअरस्टो यानं भारताविरुद्ध निराशाजनक कामगिरीचा पाढा अहमदाबाद कसोटीतही गिरवला. त्याला दोन्ही डावांत कमाल दाखवता आली नाही. भारताविरुद्ध ७ कसोटीत त्याला केवळ २४ धावाच करता आल्या आहेत.या सात कसोटीतींल पाच डावांमध्ये त्याला भोपळाही फोडता आला नाही. अक्षर पटेलची जगातल्या तगड्या गोलंदाजांना टक्कर, नरेंद्र मोदी स्टेडियमवर नोंदवला विश्वविक्रम
- जो रूटचा डबल धमाका, मालिकेत द्विशतक अन् पाच विकेट्स
एकाच कसोटी मालिकेत द्विशतक आणि पाच विकेट्स असा पराक्रम करणारा रुट हा तिसरा कर्णधार ठरला. यापूर्वी डेनीस अॅटकिसन ( वि. ऑस्ट्रेलिया १९५५) आणि वासीम अक्रम ( वि. झिम्बाब्वे, १९९६) यांनी अशी कामगिरी केली आहे. आर अश्विनचा अहमदाबाद कसोटीत विश्वविक्रम; सर रिचर्ड हॅडली यांना टाकलं मागे
- आर अश्विनचा पराक्रम, बेन स्टोक्सला ११ वेळा केलं बाद
आर अश्विननं या मालिकेत दमदार कामगिरी केली आहे. चेन्नई कसोटीत शतक झळकावणाऱ्या अश्विननं अहमदाबाद कसोटीतही चांगला खेळ केला. त्यानं सात विकेट्स घेतल्या. अश्विननं दुसऱ्या डावात बेन स्टोक्सला बाद केले. त्यानं सर्वाधिक ११ वेळा बेन स्टोक्सला बाद करून इतिहास रचला.
- आर अश्विनच्या ४०० विकेट्स अन् ६०० आंतरराष्ट्रीय विकेट्स
कसोटीत ४०० विकेट्स घेणारा अश्विन हा चौथा ( अनिल कुंबळे, कपिल देव व हरभजन सिंग) भारतीय गोलंदाज आहे, तर जगातला सहावा फिरकीपटू आहे. अनिल कुंबळे ( ६१९), कपिल देव ( ४३४) आणि हरभजन सिंग ( ४१७) यांनी भारतासाठी ४००+ विकेट्स घेतल्या आहेत. त्यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ६०० विकेट्सही पूर्ण केल्या. अश्विननं कसोटीत सर्वात जलद १०० विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांत तिसरे, २०० विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांत तिसरे स्थान पटकावले होते. त्यानंतर सर्वात जलद ३०० विकेट्सचा विक्रम त्यानं स्वतःच्या नावावर केला. त्यानं ७७ कसोटीत ही कामगिरी करून सर्वात जलद ४०० विकेट घेणाऱ्या गोलंदाजांत दुसरे स्थान पटकावले. मुथय्या मुरलीधरननं ७२ कसोटीत हा पराक्रम केला. अश्विननं सर रिचर्ड हॅडली व डेल स्टेन ( ८० कसोटी) यांचा विक्रम मोडला. १९८२नंतर इंग्लंडच्या कर्णधारांमध्ये जो रूट ठरला सरस, वासीम अक्रमच्याही विक्रमाशी बरोबरी
नाईट कसोटीत ११ विकेट्स घेणारा तो जगातला पहिला गोलंदाज ठरला आहे. त्यानं पहिल्या डावात ३८ धावांत ६ विकेट्स घेतल्या होत्या, तर दुसऱ्या डावात ३२ धावांत ५ फलंदाज माघारी पाठवले.
- सलग तीन डावांमध्ये पाच विकेट्स
इंग्लंडविरुद्ध कसोटीच्या दोन्ही डावांत ५-५ विकेट्स घेणारा तो तिसरा भारतीय गोलंदाज आहे. यापूर्वी लक्ष्मण शिवारामाकृष्णन आणि आर अश्विन यांनी हा पराक्रम केला होता. कारकिर्दीत पहिल्या दोन कसोटीत तीनवेळा पाच विकेट्स घेणारा तो दुसरा भारतीय गोलंदाज आहे. यापूर्वी नरेंद्र हिरवानी यांनी हा कारनामा केला. अक्षर पटेलनं या सामन्यात ११, तर आर अश्विननं या सामन्यात ७ विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. चेंडूला थूंकी लावली, अम्पायरसोबत हुज्जत घातली; भारताला रोखण्यासाठी इंग्लंडनं अनेक रडीचे डाव खेळले!
- सर्वात कमी चेंडूंत लागला कसोटीचा निकाल
भारत-इंग्लंड यांच्यातल्या तिसऱ्या कसोटीचा निकाल हा ८४२ चेंडूंत लागला. १९३५ नंतर हा सर्वात कमी चेंडूत लागलेला निकाल आहे. १९३५मध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध इंग्लंड या कसोटीचा निकाल ६७२ चेंडूत लागला होता.
Web Title: Big News: Team India makes history at Narendra Modi Stadium; Registered10 big records
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.