आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं ( आयसीसी) मंगळवारी चार महत्त्वाच्या नियमांना मंजूरी दिली आहे. त्यात महत्त्वाचे म्हणजे चेंडू चमकावण्यासाठी थुंकी किंवा घामाच्या वापरावर सक्त बंदी घालण्यात आली आहे. शिवाय आंतरराष्ट्रीय मालिकांमध्ये स्थानिक अंपायर्सना संधी देण्यात येणार आहे. आयसीसीच्या मुख्य कार्यकारी समितीकडे अनिल कुंबळे यांच्या अध्यक्षतेखालील समितीनं नियम बदलाचे काही प्रस्ताव ठेवले होते. कोरोना व्हायरसच्या संकटात खेळाडू आणि सामनाधिकाऱ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन हे प्रस्ताव ठेवण्यात आले होते आणि त्यांना आज मंजूरी देण्यात आली.
- कोरोना व्हायरसचा बदली खेळाडू - कसोटी सामन्यात एखाद्या खेळाडूमध्ये कोरोनाची लक्षणं दिसल्यास त्याच्या जागी आता संघाला बदली खेळाडू खेळवता येईल. बदली खेळाडूला सामनाधिकारी मंजूरी देतील. पण, हा नियम वन डे आणि ट्वेंटी-20 सामन्यांसाठी लागू नसेल.
- थुंकी किंवा घामाच्या वापरावर बंदी - चेंडू चमकावण्यासाठी थुंकी किंवा घामाचा वापर करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. चेंडूबाबतचा निर्णय पंच घेतील. नियमांचे उल्लंघन झालेले आढळल्यास खेळाडूंना वॉर्निंग दिली जाईल. दोन वेळा वॉर्निंग देऊनही खेळाडूंनी न ऐकल्यास संघाला 5 धावांची पेनल्टी दिली जाईल. म्हणजे फलंदाजी करणाऱ्या संघाच्या धावसंख्येत पाच धावा जोडल्या जातील.
- तटस्थ पंच नसेल - कोरोना व्हायरसमुळे आलेल्या बंधनामुळे सध्यातरी स्थानिक पंचांची सामन्यासाठी नियुक्ती केली जाईल.
- अतिरिक्त DRS - प्रत्येक संघाला प्रत्येक डावासाठी अतिरिक्त DRS दिला जाणार आहे. त्यानुसार प्रत्येक संघाला कसोटी सामन्यात प्रती डावासाठी तीन,तर मर्यादित षटकांच्या सामन्यासाठी दोन DRS घेता येणार आहेत.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
Most Expensive: पत्नीला घटस्फोट देणं खेळाडूंना पडलं 'महागात'; पोटगीची किंमत ऐकून चक्रावेल डोकं!
OMG : इटालियन फुटबॉल फॅन्सच्या चाहत्या अँकरच्या घरी चोरी; 1.27 कोटींच्या वस्तू लंपास!
Broom Broom... महेंद्रसिंग धोनीचं Bike कलेक्शन अन् त्यासाठी उभारलाय अलिशान बंगला!
इशांत शर्मा अडचणीत सापडणार? डॅरेन सॅमीवरील सहा वर्षांपूर्वीची 'ती' पोस्ट व्हायरल!
सोशल डिस्टन्सिंगसाठी बंद केलं स्टेडियम, पण Viral Videoचा शेवट पाहून बसेल धक्का!
Web Title: Breaking : Interim changes to the ICC's playing regulations have been confirmed
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.