नवी दिल्ली: चीनमध्ये थैमान घातलेल्या कोरोना विषाणूचे संकट आता भारतात येऊन धडकले आहे. देशातील विविध शहरात कोरोनाचा संसर्ग झालेले रुग्ण आढळल्याने प्रशासन सतर्क झाले असून, खबरदारी म्हणून अनेक उपाय अवलंबण्यात येत आहेत. कोरोनाचा परिणाम जगभरात आयोजित करण्यात येणाऱ्या अनेक क्रीडा स्पर्धांवरही झाला आहे. जुलै महिन्यात होणाऱ्या टोकियो ऑलिम्पिकवरही रद्द करण्याचं संकट ओढावलं आहे. तसेच भारतातील लोकप्रिय क्रिकेट लीग असलेल्या आयपीएललाही कोरोनाचा फटका बसला आहे.
कोरोना व्हायरसमुळे आयपीएलचे आयोजन पुढे ढकलण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे. आयपीएल 2020ची स्पर्धा 29 मार्चपासून सुरुवात होणार होती. मात्र कोरोनामुळे दिल्ली सरकारने दिल्लीत एकही आयपीएलचे सामने न खेळवण्याचे जाहीर केले. यानंतर बीसीसीआयने आयपीएलचे सामने 29 मार्च ऐवजी 15 एप्रिलपासून खेळवणार असल्याचे जाहीर केले आहे. कोरोना व्हायरसचा धोका टाळण्यासाठी आम्ही आयपीएलचे आयोजन पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला असल्याचे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे.
सध्या भारतात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मात्र 10 ते 15 एप्रिलपर्यंत कोरोना व्हायरसचा प्रभाव कमी होईल अशी शक्यात वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे बीसीसीआयने आयपीएलचे आयोजन पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान व्हिसा बंदीमुळे आयपीएलच्या सुरुवातीच्या टप्प्यात विदेशी खेळाडू मैदानावर दिसणार नाहीत. आयपीएल रिकाम्या स्टेडियममध्ये करण्याची शक्यता असली तरी ही लीग रद्द होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. २९ एप्रिलपासून सुरू होणाऱ्याा सामन्यात जवळपास ६० विदेशी खेळाडू मैदानावर दिसणार नाहीत.
बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले की, आयपीएलमध्ये खेळणारे विदेशी खेळाडू बिझनेस व्हिसा श्रेणीत मोडतात. सरकारच्या निर्देशानुसार त्यांना १५ एप्रिलपर्यंत व्हिसा नाकारण्यात आला आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक सरकारने आधीच मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूच्या स्थानिक सामन्यांबाबत चिंता व्यक्त केली आहे.
Read in English
Web Title: Breaking: IPL 2020: it is almost certain that the BCCI has decided to postpone the IPL event due to the Corona virus mac
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.