इंग्लंडचा संघ या महिन्यात श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यात दोन कसोटी सामने होणार आहेत. 7 मार्चपासून इंग्लंडचा श्रीलंका दौरा सुरु होणार आहे आणि दोन सराव सामन्यांनंतर 19 मार्चपासून कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. पण, या मालिकेला रवाना होण्यापूर्वी इंग्लंडच्या संघानं एक निर्धार केला आहे. या मालिकेत ते श्रीलंकेच्या कोणत्याच खेळाडूशी हात मिळवणार नाहीत, अशी माहिती इंग्लंडचा कर्णधार जो रुट यानं दिली. यामागचं कारण ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.
सध्या जगभरात कोरोना व्हायरसची धास्ती आहे आणि त्यामुळेच इंग्लंडच्या खेळाडूंनी हा निर्णय घेतला आहे. श्रीलंका दौऱ्यात प्रतिस्पर्धी खेळाडूंशी हात मिळवणार नाही. प्रतिस्पर्धी खेळाडूंबद्दल आमच्या मनात आदर आहे, परंतु कोरोना व्हायरसची लागण टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. हाताची मुठ एकमेकांच्या हातावर मारून आदर व्यक्त करणार असल्याचे रूटनं सांगितले. नुकत्याच झालेल्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यात इंग्लंडच्या खेळाडूंना गॅस्ट्रो आणि तापाच्या आजाराचा सामना करावा लागला होता.
रूट म्हणाला,''दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील अनुभवानंतर आम्ही अन्य खेळाडूंशी कमीतकमी संपर्क होईल याची दक्षता घेणार आहोत. जर्म्स आणि बॅक्टेरीया यांच्यापासून वाचण्यासाठी वैद्यकीय सल्लागारांनी आम्हाला काही महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार श्रीलंका दौऱ्यावर आम्ही प्रतिस्पर्धी खेळाडूंसोबत हस्तांदोलन करणार नाही. मैदानावर उतरताना आम्ही अँटी बॅक्टेरीया वाईप्स वापरणार आहोत.''
कोरोनाच्या विषाणूंनी जगातील तब्बल ६0 देशांमध्ये हाहा:कार माजविला असून, भारतातही पाच जणांना कोरोनाची लागण झाल्याचे सांगण्यात येत आहे. केंद्र सरकारने मात्र दिल्ली, तेलंगणा व राजस्थानात एक अशा तिघांना लागण झाल्याचे नमूद केले आहे. या आजारामुळेच आरोग्य मंत्रालयाने नागरिकांना चीनबरोबरच, इटली, सिंगापूर, दक्षिण कोरिया, इराण या देशांत न जाण्याचा सल्ला दिला आहे. शेजारच्या बांगलादेश, पाकिस्तान, श्रीलंका या देशांतही कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत.
China Coronavirus: कोरोना व्हायरसचे भारतात ५ रुग्ण; बचावासाठी उचला 'ही' १० पाऊले, अन्यथा...
'जब इंडिया मे ये लोग आयेंगे, तब...' विराट कोहलीच्या धक्कादायक विधानानं खळबळ
टीम इंडियाच्या 'व्हाईटवॉश'ला राहुल द्रविडही जबाबदार?; जाणून घ्या नेमकं कनेक्शन
न्यूझीलंड मालिकेतील अपयश; टीम इंडियाच्या कसोटी संघातून तीन खेळाडूंना मिळू शकतो डच्चू!
Web Title: China Coronavirus: No Hand Shakes in Tour of Sri Lanka, say England captain Joe Root svg
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.