ख्रिस गेल ( Chris Gayle) वेस्ट इंडिज संघाकडून ट्वेंटी-20 सामना खेळण्यासाठी मैदानावर उतरणार आहे. श्रीलंकेविरुद्धच्या ट्वेंटी-20 व वन डे मालिकेसाठी विंडीज संघांची शनिवारी घोषणा करण्यात आली. त्यात ४१ वर्षीय गेलला ट्वेंटी-20 संघात समावेश करण्यात आला आहे. दोन वर्षांनंतर गेल विंडीजच्या ट्वेंटी-20 संघाकडून खेळणार आहे. आपल्या ट्वेंटी-20 क्रिकेटमधील अनुभवाचा संघाला फायदा मिळवून देण्याचा गेलचा प्रयत्न आहे. गेलच्या या समावेशामुळे तो यंदा भारतात ऑक्टोबर-नोब्हेंबर महिन्यात होणाऱ्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कपमध्येही फटकेबाजी करताना दिसेल, अशी शक्यता बळावली आहे. ( Chris Gayle returns to West Indies T20 squad )
जमैकन फलंदाज गेलनं ५८ ट्वेंटी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांत प्रतिनिधित्व केलं आणि मार्च २०१९मध्ये तो इंग्लंडविरुद्ध अखेरचा ट्वेंटी-20 सामना खेळला होता. त्याच्या नावावर १६२७ धावा आहेत आणि ११७ ही त्याची सर्वोत्तम वैयक्तिक खेळी आहे. ''ट्वेंटी-20 वर्ल्ड कप कायम राखण्यासाठी आम्ही संघबांधणी करत आहोत. त्यामुळे सर्वोत्तम संघ मैदानावर उतरवण्याची ही योग्य वेळ आहे. ख्रिस गेलनं नुकत्याच पार पडलेल्या स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे त्याच्या समावेशाचा संघाला नक्कीच फायदा होईल,''असे विंडीज संघाचे निवड समिती प्रमुख रॉजर हार्पर यांनी सांगितले. IPL 2021 Venues : मुंबईकर यंदा आयपीएलच्या सामन्यांना मुकणार; BCCIने निवडली पाच शहरं, फायनल अहमदाबादमध्ये?
पाकिस्तान सुपर लीगमधून माघार
गेल सध्या पाकिस्तान सुपर लीगमध्ये क्युएत्ता ग्लॅडिएटर्स संघाकडून खेळत आहे. पण, राष्ट्रीय कर्तव्यासाठी त्यानं आता पाकिस्तान सुपर लीगमधून माघार घेतली आहे. श्रीलंकेविरुद्ध ट्वेंटी-20 मालिकेतील सामने ३, ५ व ७ मार्चला खेळवण्यात येणार आहेत.
८ वर्षानंतर गोलंदाज राष्ट्रीय संघात परतला
गेलसोबतच ३९ वर्षीय जलदगती गोलंदाज फिडेल एडवर्ड याची या मालिकेसाठी निवड केली गेली आहे. २०१२ नंतर तो प्रथमच राष्ट्रीय संघाकडून खेळणार आहे. अँटिग्वा येथे ट्वेंटी-20 सामन्यांची मालिका होईल. त्यानंतर सर व्हीव्हीयन रिचर्ड्स स्टेडियमवर १०, १२ व १४ मार्चला वन डे सामने खेळवण्यात येतील. आंद्रे रसेलनं कोरोनावर मात केली असली तरी त्यानं ट्वेंटी-20 मालिकेतून माघार घेतली आहे.
ट्वेंटी-20 संघ - किरॉन पोलार्ड ( कर्णधार), निकोलस पूरन, फॅबीयन अॅलन, ड्वेन ब्राव्हो, फिडेल एडवर्ड्स, आंद्रे फ्लेचर, ख्रिस गेल, जेसन होल्डर, अकील होसैन, एव्हिन लुईस, ओबेड मॅकॉय, रोव्हमन पॉवेल, लेंडल सिमन्स, केव्हीन सिनक्लेअर.
वन डे संघ - किरॉन पोलार्ड ( कर्णधार), शे होप, फॅबीयन अॅलन, डॅरेन ब्राव्हो, जेसन होल्डर, अकील होसैन, अल्झारी जोसेफ, एव्हीन लुईस, कायले मेयर्स, जेसन मोहम्मद, निकोलर पूरन, रोमारीओ शेफर्ड, केव्हीन सिनक्लेअर.
Web Title: Chris Gayle returns to West Indies T20 squad after two-year absence; T20 & ODI squad for the Sri Lanka series
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.