Corona Virus मुळे आता 'मिनी आयपीएल'चा प्रस्ताव; वर्ल्ड कपचा फॉरमॅट कॉपी करणार? 

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ ( बीसीसीआय) आणि इंडियन प्रीमिअर लीगमधील ( आयपीएल) फ्रँचायझी यांच्यात शनिवारी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2020 09:31 AM2020-03-15T09:31:54+5:302020-03-15T09:33:44+5:30

whatsapp join usJoin us
Corona Virus impact : IPL 2020 will be possibly a 2019 ICC World Cup-like format svg | Corona Virus मुळे आता 'मिनी आयपीएल'चा प्रस्ताव; वर्ल्ड कपचा फॉरमॅट कॉपी करणार? 

Corona Virus मुळे आता 'मिनी आयपीएल'चा प्रस्ताव; वर्ल्ड कपचा फॉरमॅट कॉपी करणार? 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देआयपीएल संदर्भात बैठकीत ६-७ पर्यायांवर झाली चर्चाबीसीसीआयचे वरिष्ठ पदाधिकारी आणि फ्रँचायझी मालकांची उपस्थिती

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ ( बीसीसीआय) आणि इंडियन प्रीमिअर लीगमधील ( आयपीएल) फ्रँचायझी यांच्यात शनिवारी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. गव्हर्निंग काऊंसिलनं बोलावलेल्या या बैठकीत आयपीएलच्या १३व्या मोसमासंदर्भात चर्चा झाली. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर आयपीएलचे १३वे मोसम १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आला आहे आणि त्यानंतर कोणती पावलं उचलायची यासंदर्भात या बैठकीत चर्चा झाली. त्यानुसार फ्रँचायझी आणि बीसीसीआय यांनी ६ ते ७ पर्यायांवरही चर्चा केली.


बीसीसीआयने स्पर्धेला १५ एप्रिलपासून प्रारंभ केला, तर स्पर्धा ४० दिवस चालेल. कारण अन्य आंतरराष्ट्रीय संघांचा आयसीसी भविष्य दौरा कार्यक्रम (एफटीपी) बघता, ही स्पर्धा अधिक काळ लांबविणे शक्य होणार नाही.''आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. लोकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य असणार आहे. सरकारच्या सूचनेनुसार आम्ही सर्व स्थानिक स्पर्धा रद्द केलेल्या आहेत. आम्ही सर्व फ्रँचायजी मालकांशी चर्चा केली आहे. सध्याची स्थिती व पुढे काय होऊ शकते यावर आम्ही चर्चा केली. आम्ही आयपीएलचे आयोजन करु इच्छित आहोत,'' असे बीसीसीआयचे अध्यक्ष सौरभ गांगुलीने स्पष्ट केले.

आयपीएलचे १३वे मोसम २९ मार्चएवजी १५ एप्रिलपासून सुरू  करण्याच्या निर्णय घेण्यापूर्वी बीसीसीआयनं सामने बंद दरवाजात खेळवता येतील, का यावरही विचार केला. आता मिनी आयपीएल खेळवण्यात येणार असून डबल हेडर सामन्यांची संख्या वाढवण्यात येईल. पण, स्टार स्पोर्ट्स याच्या विरोधात असल्याचे समजते. त्यामुळे सामन्यांची संख्या कमी करून २०१९च्या वर्ल्ड कपच्या फॉरमॅटनुसार आयपीएल खेळवण्याचा विचार झाला. त्यानुसार दोन गटांत संघाची विभागणी करण्यात येईल आणि गटातील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. त्यानंतर अंतिम सामना होईल. या बैठकीत ६-७ पर्यायांवर चर्चा झाल्याची माहिती बीसीसीआयच्या सूत्रांनी दिली.  

अन्य महत्त्वाच्या बातम्या

Coronavirus : बीसीसीआयला १० हजार कोटींचा फटका? आयोजनाबाबत ठोस निर्णय नाही

 

 

Web Title: Corona Virus impact : IPL 2020 will be possibly a 2019 ICC World Cup-like format svg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.