भारतीय संघाचा माजी गोलंदाज इरफान पठाण आणि त्याचा भाऊ युसूफ पठाण यांनी कोरोना व्हायरसची मुकाबला करण्यासाठी पुढाकार घेताना समाजकार्य केले आहे. त्यांनी सुरुवातीला स्थानिक हॉस्पिटल्सला 4000 मास्कचं वाटप केलं. त्यानं लॉकडाऊनच्या काळात गरजूंवर उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी 10 हजार किलो तांदूळ आणि 700 किलो बटाटे दान केले. आता आणखी एका कोरोना रुग्णाच्या मदतीसाठी इरफान पठाणनं पुढाकार घेतला आहे.
जगभरातील कोरोना रुग्णांची संख्या 48 लाख 18,676 इतकी झाली आहे. त्यापैकी 3 लाख 16,953 रुग्ण दगावले असले तरी 18 लाख 64,118 रुग्ण बरे झाले आहेत. भारतातील कोरोना रुग्णांचा आकडा 96,169 इतका झाला आहे. त्यापैकी 36,824 रुग्ण बरे झाले आहेत आणि 3029 जणांना प्राण गमवावे लागले. देशातील कोरोना रुग्णांचा वाढता आकडा लक्षात घेता 31 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे.
या संकटावर मात करण्यासाठी केंद्र व राज्य सरकार आपापल्या परीनं सर्वतोपरी प्रयत्न करताना पाहायला मिळत आहेत. त्यात NGO, विविध क्षेत्रातील दिग्गज मंडळी पुढे येऊन मदतीचा हात देत आहेत. पठाणने नुकतंच एक ट्विट रिट्विट केलं. त्यात एका कोरोना रुग्णाची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर लवकरच प्लाझमा थॅरेपी करण्याची गरज आहे. त्यासाठी B+ रक्ताची आवश्यकता हवं आहे. रिषी सेठ नावाच्या व्यक्तीचं ते ट्विट इरफान पठाणनं रिट्विट करून मदतीचं आवाहन केलं आहे.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
मर्यादा ओलांडू नकोस, अन्यथा तुझी लायकी दाखवून देईन; आफ्रिदीच्या विधानानंतर हरभजन सिंग भडकला
22 कोटींना घेऊन आलास, तरी काश्मीर आमचाच होता अन् राहणार; 'गब्बर'नं आफ्रिदीला खडसावलं
सध्याच्या परिस्थितीत IPL 2020 होणं अवघड, BCCIनं मांडलं परखड मत
भीक मागून जगणाऱ्या तुझ्या देशासाठी काहीतरी कर; सुरेश रैनानं आफ्रिदीला जागा दाखवली
शाहिद आफ्रिदी म्हणतो... त्याच्या बायोपिकमध्ये हॉलिवूड-बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्यांनी मूख्य भूमिका करावी
युवराज सिंगनं दिली गुड न्यूज; लवकरच घरी हलणार पाळणा?
Web Title: Corona Virus : Irfan pathan appeal for help corona positive patient svg
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.