दुबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेने (आयसीसी) कोरोना व्हायरस महामारीच्या वाढत्या संक्रमणामुळे आपल्या जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांसाठी ‘वर्क फॉर्म होम’ करण्याची नीती अवलंबली आहे.
अध्यक्ष शशांक मनोहर व मुख्य कार्यकारी अधिकारी मनू साहनी यांच्या व्यतिरिक्त आयसीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत या व्हायरसच्या संक्रमणामुळे प्रभावित झालेल्या क्रिकेट कॅलेंडरबाबत व्हिडिओ कॉन्फ रन्स करण्याची तयारी करीत आहेत. या जागतिक संघटनेने या योजनेसाठी अद्याप कुठली वेळ निश्चित केलेली नाही
आयसीसीचा एक प्रवक्ता म्हणाला,‘जगातील अन्य देशांप्रमाणे आयसीसीही अधिकाºयांच्या दिशानिर्देशांचे पालन करीत आहे. आता आमचे जास्तीत जास्त कर्मचारी घरूनच काम करीत आहेत. आमचे प्राधान्य कर्मचाºयांचे काम प्रभावित न होऊ देता त्यांच्या स्वास्थ्याचे रक्षण करण्याला आहे. आमच्या कर्मचाºयांमध्ये घरातून काम करण्याची क्षमता आहे. आम्ही आपले कर्मचारी, त्यांचे कुटुंब आणि व्यापक समुदायांना सुरक्षित ठेवून पूर्णपणे कार्य करू शकतो.’
चीनच्या वुहानमधून पसरलेल्या या आजारामुळे जगभरात १४ हजार लोकांचा मृत्यू झाला आहे.
पुरुषांची टी-२० विश्वकप स्पर्धा आॅक्टोबर-नोव्हेंबरमध्ये आॅस्ट्रेलियात होणार आहे, पण तेथील सरकार कोरोना व्हायरस महामारीचा मुकाबला करीत आहे. त्यामुळे या स्पर्धेच्या आयोजनावर साशंकता निर्माण झाली आहे. (वृत्तसंस्था)
Web Title: Coronavirus: Now the ICC also has a 'work from home', with many employees doing work from home
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.