निवृत्तीनंतरही हाशिम आमलाची बॅट तळपतेय, कौंटी क्रिकेटमध्ये चोपल्या ५७७ धावा, Video

दक्षिण आफ्रिकेचा स्टार फलंदाज हाशिम आमला यानं २०१९मध्ये क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2021 10:34 AM2021-05-29T10:34:18+5:302021-05-29T10:34:43+5:30

whatsapp join usJoin us
County Championship: Hasim Amla's 173 puts Surrey in command against Gloucestershire | निवृत्तीनंतरही हाशिम आमलाची बॅट तळपतेय, कौंटी क्रिकेटमध्ये चोपल्या ५७७ धावा, Video

निवृत्तीनंतरही हाशिम आमलाची बॅट तळपतेय, कौंटी क्रिकेटमध्ये चोपल्या ५७७ धावा, Video

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

दक्षिण आफ्रिकेचा स्टार फलंदाज हाशिम आमला ( Hashim Amla) यानं २०१९मध्ये क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. पण, निवृत्तीनंतरही त्याचा जलवा कायम आहे. कौंटी चॅम्पियनशीप २०२१ ( County Championship 2021) स्पर्धेत आमलाच्या बॅटीतून खोऱ्यानं धावा येतच आहेत. सरे क्रिकेब क्लबचे प्रतिनिधित्व करताना आमलानं ग्लूस्टरशर क्लबविरुद्ध ३४७ चेंडूंत १७३ धावांची खेळी केली आणि त्यात १६ चौकारांचा समावेश होता. याआधी आमलानं हँम्पशायर क्लबविरुद्ध २१५ धावांची खेळी केली होती.  Photo : महेंद्रसिंग धोनी होणार पुणेकर; पिंपरी-चिंचवड येथे घेतलंय लै भारी घर!

ग्लूस्टरशरविरुद्धच्या सामन्यात आमलाच्या १७३ धावांच्या खेळीच्या जोरावर सरे क्लबनं पहिल्या डावात ४७३ धावांचा डोंगर उभा केला. आमला व्यतिरिक्त रेयान पटनेल ( ६२), जेमी ओव्हर्टन ( ५०) यांनी चांगला खेळ केला. रिकी क्लार्क ( ६५) व सीन अबॉट ( ४०) यांनीही योगदान दिले . आमलानं यंदाच्या कौंटी चॅम्पियनशीपमध्ये सरे क्लबकडून सर्वाधिक धावांचा विक्रम नावावर केला आहे. त्यानं आतापर्यंत ५७.७०च्या सरासरीनं ५७७ धावा केल्या आहेत. दुसऱ्या क्रमांकावर ऑली पोप आहे आणि त्यानं ५५५ धावा, तर तिसऱ्या क्रमांकावरील रोरी बर्न्सनं ५५४ धावा केल्या आहेत. पण, ३८ वर्षीय आमलानं कौंटी क्रिकेटमध्ये धमाल केली आहे.
 



आमलानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कसोटीत २८ व वन डेत २७ शतकं झळकावली आहेत. त्यानं प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १८२१३ धावे केल्या आहेत. 

Web Title: County Championship: Hasim Amla's 173 puts Surrey in command against Gloucestershire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.