कॅरेबियन प्रीमिअर लीगमध्ये ( CPL) सोमवारी मध्यरात्री झालेल्या सामन्यांत अफगाणिस्तानचा गोलंदाज नवीन-उल-हक मुरीद यानं कमालच केली. त्याच्या गोलंदाजीसमोर जेसन होल्डरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या बार्बाडोस ट्रायडंट्स संघावर नामुष्की ओढावली. ट्रायडंट्स संघाचे 8 फलंदाज अवघ्या 27 धावांत माघारी परतले. गयाना अॅमेझॉन वॉरियर्सनं हा सामना सहज जिंकला.
मोदी सरकारचा मोठा निर्णय; आणखी 20 क्रीडा प्रकारातील खेळाडूंना मिळणार सरकारी नोकरी
IPL 2020 : महेंद्रसिंग धोनीसोबत झाला वाद? मायदेशी परतलेल्या सुरेश रैनानं मौन सोडलं
प्रथम फलंदाजीला आलेल्या जॉन्सन चार्लेस ( 0) आणि जस्टीन ग्रिव्हेस ( 0) हे सलामीवीर भोपळा न फोडताच माघारी परतले. कर्णधार जेसन होल्डरही शून्यावर बाद झाला. केव्हीन सिनक्लेअर आणि ख्रिस ग्रीन यांनी सुरुवातीला धक्के दिल्यानंतर नवीन-उल-हकनं 4 षटकांत 14 धावा देताना 4 विकेट्स घेतल्या. त्याच्या या धक्क्यामुळे ट्रायडंट्सचे 8 फलंदाज 27 धावांवर माघारी परतले होते. रशीद खान ( 19) आणि हेडन वॉल्श ( 12*) यांनी अखेरच्या षटकांत थोड्या धावा केल्यामुळे ट्रायडंट्सला 92 धावा करता आल्या.
वॉरियर्सनं दोन फलंदाजांच्या मोबदल्यात हे लक्ष्य सहज पार केलं. ब्रँडन किंगनं 49 चेंडूंत 4 चौकार व 2 षटकारासह नाबाद 51 धावा केल्या. निकोलस पूरननं नाबाद 18 धावा केल्या. वॉरियर्सनं 16.4 षटकांत 2 बाद 93 धावा करून विजय मिळवला.
Web Title: CPL 2020 : Babardos Tridents 27 for 8 from 12 overs against Guyana Amazon Warriors; Amazon won by 8 wickets
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.