CPL 2020 : षटकारानं स्वागत अन् अखेरच्या चेंडूवर त्याच फलंदाजाची विकेट; प्रविण तांबेचा पराक्रम  

CPL 2020 : प्रविण तांबेचं वय वर्ष 48 अन् 323 दिवस इतके आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2020 08:41 PM2020-08-26T20:41:33+5:302020-08-26T20:41:59+5:30

whatsapp join usJoin us
CPL 2020 : Pravin Tambe becomes the first Indian to take a wicket in CPL,  | CPL 2020 : षटकारानं स्वागत अन् अखेरच्या चेंडूवर त्याच फलंदाजाची विकेट; प्रविण तांबेचा पराक्रम  

CPL 2020 : षटकारानं स्वागत अन् अखेरच्या चेंडूवर त्याच फलंदाजाची विकेट; प्रविण तांबेचा पराक्रम  

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

कॅरेबियन प्रीमिअर लीगमध्ये आज भारताच्या प्रविण तांबेनं पदार्पण केलं. बॉलिवूड सुपस्टार शाहरुख खानचा मालकी हक्क असलेल्या त्रिनबागो नाइट रायडर्स संघानं त्याला आजच्या सामन्यात त्याची अंतिम 11मध्ये निवड केली. सीपीएलमध्ये खेळणारा तो पहिलाच भारतीय खेळाडू ठरला. प्रविण तांबेचं वय वर्ष 48 अन् 323 दिवस इतके आहे. यापूर्वी त्यानं दुबईत एका लीगमध्ये सहभाग घेतला होता. त्यामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं ( बीसीसीआय) त्याच्यावर कारवाई करताना इंडियन प्रीमिअर लीगमध्ये ( आयपीएल) खेळण्याची परवानगी नाकारली होती. प्रविण तांबेनं निवृत्ती जाहीर केली आणि आज तो सीपीएलमधून पदार्पण करत आहे.

CPL 2020 : ड्वेन ब्राव्होनं रचला इतिहास; ट्वेंटी-20त विश्वविक्रम नोंदवणारा जगातला पहिला गोलंदाज

वयाच्या 41व्या वर्षी त्याला राजस्थान रॉयल्सकडून खेळण्याची संधी मिळाली. 2013मध्ये त्यानं आयपीएलमध्ये एन्ट्री घेतली. त्यापूर्वी या फिरकीपटूनं मुंबईतील अनेक क्लब्सचे प्रतिनिधित्व केलं होतं. 2013मध्ये त्यानं दिल्ली डेअरडेव्हिल्सविरुद्ध पदार्पण केलं. त्यानंतर चॅम्पियन्स लीगमध्ये त्यानं पाच सामन्यांत सर्वाधिक 12 विकेट्स घेण्याचा पराक्रम केला होता. दुबईत झालेल्या टी10 लीगमध्ये हॅटट्रिक घेतली होती.

CPL 2020 : वय वर्ष 48 अन् 323 दिवस... भारतीय खेळाडूचे कॅरेबियन प्रीमिअर लीगमध्ये पदार्पण 

CPL 2020 : कोरोना लढाईला बळ देतोय 'षटकार'; चेंडू सीमापार जाताच दान होताहेत साडेतीन हजार

रायडर्स संघानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. आंद्रे फ्लेचर आणि रहकीम कोर्नवॉल यांना झौक्सला साजेशी सुरुवात करून देता आली नाही. तिसऱ्या षटकात अली खाननं फ्लेचरला ( 10) बाद केलं. त्यानंतर चौथ्या षटकात ब्राव्होनं कोर्नवॉलला ( 18) बाद करून इतिहास रचला. ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये 500 विकेट्स घेणारा तो पहिला गोलंदाज ठरला. त्यानं 459 सामन्यांत 500 विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. लसिथ मलिंगा 390 विकेट्ससह दुसऱ्या क्रमांकावर आहे.  

त्यानंतर प्रविण तांबे गोलंदाजीला आला. नजीबुल्लाह झाद्राननं पहिल्याच चेंडूवर खणखणीत षटकार खेचून तांबेचं स्वागत केलं. पण, त्याच षटकाच्या अखेरच्या चेंडूवर तांबेनं गुगली टाकत झाद्रानला बाद केलं. झाद्रान 21 धावांत माघारी परतला. सीपीएलमध्ये खेळणारा आणि विकेट घेणारा तांबे हा पहिलाच भारतीय आहे. 


अन्य महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक : भारतीय खेळाडूनं केली पत्नी व आईची हत्या; मुलांना फोन करून सांगितली घटना

जेम्स अँडरसननं पाकिस्तानची जिरवली; तिसऱ्या कसोटीत भीमपराक्रमाची नोंद केली!  

इंग्लंडकडून वस्त्रहरण; पावसानं वाचवली पाकिस्तानची इभ्रत!

जेम्स अँडरसनच्या विश्वविक्रमात भारतीय फलंदाजांचा 'मोठा' वाटा; जाणून घ्या कसा!

IPL 2020 : युवराज सिंगसाठी घेतला होता डिसिजन; रोहित शर्मा पुन्हा बदलणार 'पोझिशन'!

सुरेश रैना करणार समाजकार्य; जम्मू-काश्मीरमधील ग्रामीण भागातील मुलांसाठी काम करण्याची इच्छा 

IPL 2020 : महेंद्रसिंग धोनीच्या संघानं ठेवला आदर्श; दुबईत जपला 'स्वदेशी' मंत्र! 

Web Title: CPL 2020 : Pravin Tambe becomes the first Indian to take a wicket in CPL, 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.