CPL 2020 : मुन्रो, ब्राव्हो, पोलार्डनं धू धू धुतलं; शाहरुख खानच्या संघाची विजयाची हॅटट्रिक 

CPL 2020 : नाइट रायडर्सचा हा सलग तिसरा विजय आहे आणि गुणतालिकेत 6 गुणांसह ते अव्वल स्थानावर आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2020 10:05 AM2020-08-24T10:05:00+5:302020-08-24T10:05:01+5:30

whatsapp join usJoin us
CPL 2020 : TRINBAGO KNIGHT RIDERS third win in a row, beat Barbados Tridents by 19 runs | CPL 2020 : मुन्रो, ब्राव्हो, पोलार्डनं धू धू धुतलं; शाहरुख खानच्या संघाची विजयाची हॅटट्रिक 

CPL 2020 : मुन्रो, ब्राव्हो, पोलार्डनं धू धू धुतलं; शाहरुख खानच्या संघाची विजयाची हॅटट्रिक 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

कॅरेबियन प्रीमिअर लीगमध्ये ( CPL) रविवारी तुफान फटकेबाजी पाहायला मिळाली. कॉलीन मुन्रो आणि डॅरेन ब्राव्हो यांच्या अर्धशतकी खेळीनंतर त्रिनबागो नाइट रायडर्सचा कर्णधार किरॉन पोलार्डनं 241च्या स्ट्राईक रेटनं फटकेबाजी केली. या त्रिकुटाच्या चौकार-षटकाराच्या आतषबाजीच्या जोरावर नाइट रायडर्स संघानं सीपीएलमध्ये रविवारी बार्बाडोस ट्रायडंट्सवर 19 धावांनी विजय मिळवला.

प्रथम फलंदाजी करताना नाइट रायडर्सच्या सुनील नरीनला ( 8) सलग तिसरी अर्धशतकी खेळी करता आली नाही. त्यानं आज सावध पवित्रा घेतला होता. लेंडल सिमन्स ( 21) पहिला माघारी परतल्यानंतर आणि 9.3 षटकापर्यंत खेळपट्टीवर असूनही नरीनला केवळ 8 धावाच करता आल्या. मुन्रोनं 30 चेंडूंत 7 चौकार व 2 षटकार खेचून 50 धावा केल्या.  त्यानंतर डॅरेन ब्राव्हो आणि पोलार्डची जोडी जमली. दोघांनी चौथ्या विकेटसाठी नाबाद 98 धावांची भागीदारी केली. ब्राव्होनं 36 चेंडूंत 4 चौकार व 4 षटकार खेचून नाबाद 54, तर पोलार्डनं 17 चेंडूंत 1 चौकार व 4 खणखणीत षटकार खेचून नाबाद 41 धावा केल्या. त्यांच्या फटकेबाजीच्या जोरावर नाइट रायडर्सने 3 बाद 185 धावा उभारल्या.




लक्ष्याचा पाठलाग करताना ट्रायडंट्सच्या जॉनसह चार्लेस आणि शे होप यांनी धडाकेबाज सुरुवात केली. पण, मधल्या फळीच्या अपयशामुळे त्यांना 19 धावांनी हार मानावी लागली. चार्लेसनं 33 चेंडूंत 4 चौकार व 3 षटकार खेचून 52 धावा केल्या, तर होपनं 2 चौकार व 1 षटकारासह 36 धावा केल्या. कर्णधार जेसन होल्डरनं 19 चेंडूंत 2 चौकार व 3 षटकारांसह नाबाद 34 धावा करताना संघाच्या विजयासाठी शर्थीचे प्रयत्न केले. अॅश्ली नर्सनं 21 धावांचं योगदान दिलं. पण, त्यांना 6 बाद 166 धावांवरच समाधान मानावे लागले.

 

Web Title: CPL 2020 : TRINBAGO KNIGHT RIDERS third win in a row, beat Barbados Tridents by 19 runs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.