कॅरेबियन प्रीमिअर लीगमध्ये ( Carabian Premier League 2021 ) बुधवारी अफलातून सामने झाले. किरॉन पोलार्डच्या त्रिनबागो नाइट रायडर्स (Trinibago Knight Riders) विरुद्ध गयाना अॅमेझॉन वॉरियर्स (Guyana Amazon Warriors) यांच्यातला सामना Super Overमध्ये खेळला गेला. पोलार्डच्या संघातील अकिल होसेन यानं १८व्या षटकात निकोलस पूरनचा अफलातून झेल घेत सामन्याला कलाटणी दिली. त्यानंतर सामना सुपर ओव्हमध्ये गेला अन् पोलार्डच्या जीवात जीव आला. सुपर ओव्हरमध्ये ७ धावांचे लक्ष्य पोलार्ड व कॉलिन मुन्रो हे तगडे फलंदाज सहज पार करतील असेच वाटत होते. पण, नाइट रायडर्सनं ६ धावाही करता आल्या नाही आणि वॉरियर्सनं हा सामना जिंकला. ( Incredible stunner of a catch by Akeal Hosein)
टीम इंडियाला दुखापतीचे ग्रहण, शमी व शर्मा बाकावर; इंग्लंडच्या पारड्यात नाणेफेकीचा कौल
नाइट रायडर्स प्रथम फलंदाजीला मैदानावर आले. सुनील नरीन ( २१), कॉलिन मुन्रो ( ३२) व इसुरू उडाना ( २१) यांनी दमदार खेळ करत संघाला २० षटकांत ९ बाद १३८ धावा केल्या. रोमारियो शेफर्ड ( ३-२४) व मोहम्मद हाफिज ( ३-१८) यांनी नाइट रायडर्सला धक्के दिले. प्रत्युत्तरात वॉरियर्सनं संघर्ष दाखवला. गोलंदाजीत कमाल करणाऱ्या हाफिजनं १६ धावांची खेळी केली, परंतु आघाडीचे फलंदाज अपयशी ठरले. शिमरोन हेटमायर ( २७) व कर्णधार निकोलस पूरन ( २७) यांनी सामना रंगतदार अवस्थेत ठेवला होता. १८व्या षटकात रवी रामपॉलच्या गोलंदाजीवर पूरन बाद झाला अन् सामन्याला कलाटणी मिळाली. अकील होसेननं सीमारेषेवर अनपेक्षित झेल टिपला. शेफर्ड ( १८) व नवीन उल हक ( १३*) यांनी संघर्ष दाखवला, परंतु तो व्यर्थ ठरला. वॉरियर्सनं ९ बाद १३८ धावा केल्यानं सामना सुपर ओव्हरमध्ये गेला. रवी रामपॉलनं सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या.
सुपर ओव्हरचा थरार..
वॉरियर्सकडून पूरन व हेटमायर फलंदाजीला आले आणि सुनील नरीन गोलंदाजी करत होता. तिसऱ्या व पाचव्या चेंडूवर नरीननं अनुक्रमे पूरन व हेटमायर यांना बाद केल्यानं वॉरियर्सला २ बाद ६ धावांवर समाधान मानावे लागले.
पोलार्ड व मुन्रो दोन चेंडूंत नाइट रायडर्सना विजय मिळवून देतील अशीच आशा होती, परंतु वॉरियर्सचा गोलंदाज शेफर्डनं कमाल केली. त्यानं पहिल्याच चेंडूवर पोलार्डला बाद केले आणि त्यानंतर फक्त चार धावा देत वॉरियर्सचा थराराक विजय पक्का केला.
Web Title: CPL 2021 : Incredible stunner of a catch by Akeal Hosein, Romario Shepherd stars as Warriors edge past TKR in Super Over thriller
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.