CPL Final किरॉन पोलार्डनं गाजवली; अनील कुंबळेच्या 11 वर्षांपूर्वीच्या विक्रमाशी बरोबरी केली, पण...

CPL Final 2020 किरॉन पोलार्डनं (Kieron Pollard) कॅरेबियन प्रीमिअर लीगमध्ये ( CPL 2020) दमदार कामगिरीचे प्रदर्शन दिलं.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2020 10:05 PM2020-09-10T22:05:29+5:302020-09-10T22:07:36+5:30

whatsapp join usJoin us
CPL Final : Kieron Pollard became a second captains after Anil Kumble who took for wickets in franchise T20 finals | CPL Final किरॉन पोलार्डनं गाजवली; अनील कुंबळेच्या 11 वर्षांपूर्वीच्या विक्रमाशी बरोबरी केली, पण...

CPL Final किरॉन पोलार्डनं गाजवली; अनील कुंबळेच्या 11 वर्षांपूर्वीच्या विक्रमाशी बरोबरी केली, पण...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

इंडियन प्रीमिअर लीगला ( Indian Premier League) सुरुवात होण्याआधी मुंबई इंडियन्सच्या ( Mumbai Indians) ताफ्यात आनंदाचे वातावरण आहे. मुंबई इंडियन्सचा ( MI) हुकमी एक्का किरॉन पोलार्डनं (Kieron Pollard) कॅरेबियन प्रीमिअर लीगमध्ये ( CPL 2020) दमदार कामगिरीचे प्रदर्शन दिलं. त्याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या त्रिनबागो नाइट रायडर्सनं ( Trinbago Knight Riders) CPL 2020 सलग 11 सामने जिंकून ऐटीत अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम फेरीतही रायडर्सची धडाकेबाज कामगिरी कायम राहिलेली पाहायला मिळाली. कर्णधार पोलार्डनं अंतिम सामन्यात डॅरेन सॅमीच्या सेंट ल्युसीआ झौक्स ( St Lucia Zouks) संघाच्या फलंदाजांना घाम फोडला. त्याच्या भेदक माऱ्यासमोर झौक्सच्या फलंदाजांना मोठी खेळी साकारता आली नाही. CPL Final 2020

IPL 2020 Anthem चोरीचं? प्रसिद्ध रॅपरचा BCCIवर गंभीर आरोप

IPL 2020त भीमपराक्रम करण्यासाठी ख्रिस गेल सज्ज; रोहित, विराट यांनाही हा विक्रम मोडणे अशक्य!

सुनील नरीनच्या अनुपस्थितीत रायडर्सचा कस लागेल असे वाटले होते, परंतु पोलार्डनं आपल्या अऩुभवाच्या जोरावर संघाला विजयाच्या दिशेने कूच करून दिली. प्रथम फलंदाजीला आलेल्या झौक्सच्या सलामीवीर रहकीम कोर्नवॉल ( 8) दुसऱ्याच षटकात अली खानच्या यॉर्करसमोर त्रिफळाचीत झाला. CPL Final 2020


त्यानंतर मार्क डेयाल व आंद्रे फ्लेचर यांनी झौक्सचा डाव सावरला. या दोघांनी अर्धशतकी भागीदारी करून झौक्सला ट्रॅकवर आणले. पण, फवाद अहमदनं 9व्या षटकात डेयालला ( 29) बाद केले. त्यानंतर पोलार्डच्या भेदक माऱ्यासमोर झौक्सच्या फलंदाजांनी शरणागती पत्करली. फ्लेचर 39, रोस्टन चेस 22  आणि नजीबुल्लाह झाद्रान 24 धावांवर बाद झाले. या तिघांनाही पोलार्डनं बाद केले. CPL Final 2020

त्यानंतर झौक्सची गाडी घसरली ती रुळावर आलीच नाही. त्यांचा संपूर्ण संघ 19.1 षटकांत 154 धावांत माघारी परतला. पोलार्डनं 30 धावांत 4 विकेट्स घेतल्या. अली खान व फवाद यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.

अनील कुंबळेच्या 11 वर्षांपूर्वीच्या विक्रमाशी बरोबरी
फ्रँचायझी ट्वेंटी-20 लीगच्या अंतिम सामन्यात चार विकेट्स घेणारा पोलार्ड हा दुसरा कर्णधार ठरला. यापूर्वी भारतीय फिरकीपटू अनील कुंबळेनं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून ( RCB) खेळताना 2009च्या IPL Finalमध्ये डेक्कन चार्जर्सविरुद्ध 16 धावांत 4 विकेट्स घेतल्या होत्या. आज पोलार्डनं तो करिष्मा करून दाखवला. कुंबळेच्या या कामगिरीनंतरही RCBला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.

अन्य महत्त्वाच्या बातम्या 

IPL 2020 : लाईक्स, कमेंट्स अन् गप्पाटप्पा; पृथ्वी शॉ अभिनेत्रीला करतोय 'डेट'? 

सानिया मिर्झा अन् शोएब मलिक यांची सात महिन्यांनी झाली भेट; पाकिस्तानी क्रिकेटपटूनं पोस्ट केला Video 

IPL 2020 : मुंबई इंडियन्स पाचव्या जेतेपदासाठी सज्ज; पण 'ही' कमकुवत बाजू करू शकते घात! 

भारतीय वायुसेनेत राफेल विमान दाखल; MS Dhoniने केलं अभिनंदन, सांगितलं फेव्हरिट विमानाचं नाव

CSKची स्ट्रॅटेजी ठरली, सुरेश रैनाच्या जागी उतरवणार स्फोटक ओपनर; शेन वॉटसननं सांगितला गेम प्लान

Web Title: CPL Final : Kieron Pollard became a second captains after Anil Kumble who took for wickets in franchise T20 finals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.