ऑस्ट्रेलियाची तालिबान्यांना धमकी; महिला क्रिकेटला मान्यता द्या, नाही तर...

महिलांसाठी क्रिकेट खेळणे आवश्यक नाही, असे तालिबानच्या सांस्कृतिक आयोगाचा उपाध्यक्ष अहमदुल्लाह वासिकने म्हटले होते....

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2021 12:21 PM2021-09-09T12:21:42+5:302021-09-09T12:31:41+5:30

whatsapp join usJoin us
cricket australia says will not host afghanistan men team in november if women are not allowed to compete | ऑस्ट्रेलियाची तालिबान्यांना धमकी; महिला क्रिकेटला मान्यता द्या, नाही तर...

ऑस्ट्रेलियाची तालिबान्यांना धमकी; महिला क्रिकेटला मान्यता द्या, नाही तर...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext


मेलबर्न - अफगाणिस्तानातमहिलांना क्रिकेट खेळण्याचे स्वातंत्र्य मिळाले नाही, तर आम्ही पुरुष संघासोबत पूर्वनियोजित कसोटी खेळणार नाही, असा स्पष्ट इशारा क्रिकेट ऑस्ट्रेलियाने गुरुवारी तालिबान्यांना दिला. यापूर्वी, महिलांसाठी क्रिकेट खेळणे आवश्यक नाही, असे तालिबानच्या सांस्कृतिक आयोगाचा उपाध्यक्ष अहमदुल्लाह वासिकने म्हटले होते. यानंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने हा इशारा दिला आहे. तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाचे क्रीडा मंत्री रिचर्ड कोलबेक यांनीही याप्रकरणी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे कारवाईची मागणी केली होती. (cricket australia says  will not host afghanistan men team in november if women are not allowed to compete )

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने म्हटले आहे, "ऑस्ट्रेलियन क्रिकेट जगभरातील महिला क्रिकेटच्या विकासाला अत्यंत महत्त्व देते. खेळ सर्वांसाठीच आहे आणि महिलांनाही सर्व स्थरांवर खेळण्याचा समान अधिकार आहे, असे आम्ही मानतो. अफगाणिस्तानातील सत्तांतरानंतर, लोक दहशतीखाली आहेत. अगदी क्रिकेटपटू राशिद खाननेही याबाबत ट्विट करून आपल्या लोकांना वाचविण्याचे आवाहन केले होते.

याशिवाय, नुकतेच, माध्यमांनी म्हटले आहे, की अफगाणिस्तानमध्ये महिला क्रिकेटला पाठिंबा दिला जाणार नाही. असे असेल, तर होबार्टमधील प्रस्तावित पुरुष संघासोबतच्या कसोटी सामन्याचे आयोजन रद्द करण्याशिवाय ऑस्ट्रेलियाकडे कुठलाही पर्याय नसेल, असेही क्रिकेट ऑस्ट्रेलियाने म्हटले आहे.

अफगाणिस्तानात पत्रकारांसोबत तालिबानची क्रूरता; आंदोलक महिलांनाही जबर मारहाण

महत्वाचे म्हणजे, ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान यांच्यात होबार्ट येथे 27 नोव्हेंबरपासून एक कसोटी सामना खेळला जाणार आहे. मात्र, तालिबान सरकारने महिला क्रिकेटसंदर्भात घेतलेल्या भूमिकेमुळे, आता या सामन्यावर संकट आले आहे.

Web Title: cricket australia says will not host afghanistan men team in november if women are not allowed to compete

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.