क्रिकेट ऑस्ट्रेलियानं जाहीर केलेलं वेळापत्रक अंतिम नाही; BCCI ने दिले महत्त्वाचे संकेत

क्रिकेट ऑस्ट्रेलियानं गुरूवारी भारताविरुद्धच्या मालिकेचं वेळापत्रक जाहीर केलं.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2020 03:38 PM2020-05-29T15:38:49+5:302020-05-29T15:39:55+5:30

whatsapp join usJoin us
Cricket Australia's schedule of India tour not final, say BCCI svg | क्रिकेट ऑस्ट्रेलियानं जाहीर केलेलं वेळापत्रक अंतिम नाही; BCCI ने दिले महत्त्वाचे संकेत

क्रिकेट ऑस्ट्रेलियानं जाहीर केलेलं वेळापत्रक अंतिम नाही; BCCI ने दिले महत्त्वाचे संकेत

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

क्रिकेट ऑस्ट्रेलियानं गुरूवारी भारताविरुद्धच्या मालिकेचं वेळापत्रक जाहीर केलं. भारतीय संघाव्यतिरिक्त क्रिकेट ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड, अफगाणिस्तान आणि ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेचं आयोजन करणार आहे. पण, कोरोना व्हायरसच्या संकटात ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेबाबतचा निर्णय आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं (आयसीसी) 10 जूनपर्यंत राखून ठेवला आहे. त्यात आता क्रिकेट ऑस्ट्रेलियानं जाहीर केलेलं वेळापत्रक अंतिम नसून त्यात बदल होईल, असे विधान भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (बीसीसीआय) केलं जात आहे.

पण, बीसीसीआयचे खजिनदार अरुण धुमाल यांनी जर ट्वेंटी-20 वर्ल्ड कप न झाल्यास वेळापत्रकात बदल होईल असं सांगितले. ट्वेंटी-20 वर्ल्ड कपपूर्वी भारतीय संघ तीन ट्वेंटी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. त्यानंतर वर्ल्ड कप स्पर्धा आणि त्यानंतर चार कसोटी व तीन वन डे सामन्यांची मालिका होणार आहे. पण, जर वर्ल्ड कप न झाल्यास ट्वेंटी-20 मालिकेच्या वेळापत्रकात बदल होऊ शकतो.

धुमाल म्हणाले,''आठ वर्षांचा FTP आधीच ठरवण्यात आला आहे. त्यामुळे जर ट्वेंटी-20 वर्ल्ड कप होत नसेल, तर ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियात जाण्यात काय अर्थ. त्यानंतर परत या आणि परत जा. FTP नुसार आम्ही जुलै महिन्यात श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहोत. जर खेळाडूंच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं योग्य असेल तर दौरा केला जाईल. सध्यातरी काहीच रद्द झालेले नाही.''
  
पाहा संपूर्ण वेळापत्रक
ट्वेंटी-20 मालिका
11 ऑक्टोबर - ब्रिस्बेन
14 ऑक्टोबर - कॅनबेरा
17 ऑक्टोबर - अॅडलेड
 
कसोटी मालिका
वि. भारत, गॅबा, 3 ते 7 डिसेंबर
वि. भारत, अॅडलेड, 11 ते 15  डिसेंबर
वि. भारत, मेलबर्न, 26- 30 डिसेंबर
वि. भारत, सिडनी, 3 ते 7 जानेवारी 2021

वन डे मालिका
12 जानेवारी 2021 - पर्थ
15 जानेवारी 2021 - मेलबर्न
17 जानेवारी 2021 - सीडनी  

अन्य महत्त्वाच्या बातम्या

टीम इंडियाच्या माजी खेळाडूचा अपघात; गाडीची अवस्था पाहून उडेल थरकाप!

भाजपा खासदार गौतम गंभीरच्या वडिलांच्या गाडीची चोरी

सोशल अकाऊंटवरून पॉर्न क्लिप व्हायरल; पाकिस्तानी गोलंदाज ट्विटवर होतोय ट्रेंड!

हरभजन सिंगची मस्करी करणं विराट कोहलीला पडलं महाग; फिरकीपटूनं दिलं चॅलेंज

भारत मुद्दाम वर्ल्ड कपचा तो सामना हरला!; पाक क्रिकेटपटूच्या राजकारणाला बेन स्टोक्सचे सडेतोड उत्तर

हजार फुटांवरून त्यानं सहकाऱ्याला फेकलं; शोएब अख्तरनं शेअर केला थरकाप उडवणारा Video

Web Title: Cricket Australia's schedule of India tour not final, say BCCI svg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.