MI vs SRH : ३०० धावसंख्येची भविष्यवाणी करुन फसला माजी क्रिकेटर; आता शब्दांचा खेळ, म्हणाला...

सोशल मीडियावर माजी क्रिकेटर ट्रोल होताना दिसत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2025 22:57 IST2025-04-17T22:50:29+5:302025-04-17T22:57:07+5:30

whatsapp join usJoin us
Cricket Fans Troll Dale Steyn After He Prediction First 300 In IPL Proved Wrong Sunrisers Hyderabad vs Mumbai Indians Match | MI vs SRH : ३०० धावसंख्येची भविष्यवाणी करुन फसला माजी क्रिकेटर; आता शब्दांचा खेळ, म्हणाला...

MI vs SRH : ३०० धावसंख्येची भविष्यवाणी करुन फसला माजी क्रिकेटर; आता शब्दांचा खेळ, म्हणाला...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील पहिल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादच्या संघानं राजस्थान विरुद्धच्या सामन्यात २८६ धावा केल्याचे पाहायला मिळाले होते. या सामन्यानंतर हा संघ आयपीएलच्या इतिहासात ३०० धावा करणारा पहिला संघ ठरेल, अशी चर्चा रंगू लागली. दक्षिण आफ्रिकेचा माजी जलगती गोलंदाजही या चर्चेत सहभागी झाला होता. त्याने मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील सामन्यात आयपीएलच्या इतिहासातील ३०० धावसंख्येचा आकडा पाहायला मिळेल, अशी भविष्यवाणी केली होती. मुंबई इंडियन्सच्या संघाने सनरायझर्स हैदराबादच्या संघाला निर्धारित २० षटकात ५ बाद १६२ धावांवर रोखले. अन् त्याची भविष्यवाणी खोटी ठरली. त्यामुळे सोशल मीडियावर माजी क्रिकेटर ट्रोल होताना दिसत आहे.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

डेल स्टेन याने खूप आधी केली होती भविष्यवाणी, अंदाज चुकल्यावर म्हणाला...

डेल स्टेन याने २३ मार्चला एक्स अकाउंटवरून एक ट्विट केले होते. ज्यात त्याने लिहिले होते की, १७ एप्रिल रोजी मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील सामन्यात आयपीएलमध्ये ३०० धावा पाहायला मिळतील. पण त्याची ही भविष्यवाणी खोटी ठरली. त्यामुळे ट्रोल होत असताना त्याने दुर्दैवाने आज ३०० धावा झाल्या नसल्या असे ट्विटरही केले आहे. एवढेच नाही तर दोन्ही संघ मिळून ३०० धावा करतील, अशी मजेशीर कमेंट केल्याचे दिसते. 

 IPL 2025 MI vs SRH : काय करायचं त्या बॉलरनं? दीपक चाहरनं जोर लावला! पण...

 खेळपट्टी गोलंदाजांवर मेहरबानच MI च्या गोलंदाजांनी उचलला फायदा

 मुंबई येथील वानखेडेच्या मैदानात सनरायझर्स हैदराबादची सलामी जोडी बराच काळ टिकली. पण त्यांची धावगती संथ गतीने पुढे सरकताना दिसली. पहिल्या १० षटकात त्यांनी २ विकेट्सच्या मोबदल्यात ७५ धावा केल्या होत्या. वानखेडेची खेळपट्टी फलंदाजांसाठी अनुकूल मानली जाते. त्यामुळेच कदाचित डेल स्टेन याने हैदराबादच्या स्फोटक फलंदाजीकडून ही अपेक्षा केली होती. पण खेळपट्टीनं एक वेगळाच रंग दाखवला. त्यात मुंबईच्या गोलंदाजांनी स्फोटक फलंदाजीला उत्तमरित्या लगाम लावला. अभिषेक शर्मा ४०(२८), ट्रॅविस हेड २८ (२९),  नितिश रेड्डी १९ (२१), क्लासेन ३७ (२७) आणि अनिकेत वर्मानं अखेरच्या  षटकात ८ चेंडूत केलेल्या नाबाद १८ धावांच्या खेळीच्या जोरावर हैदराबादच्या संघाने १६२ धावांपर्यंतत मजल मारली.

Web Title: Cricket Fans Troll Dale Steyn After He Prediction First 300 In IPL Proved Wrong Sunrisers Hyderabad vs Mumbai Indians Match

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.