ठळक मुद्देसुरेश रैना आणि हरभजन सिंग यांनी माघार घेतल्यानं CSKला मोठा धक्काच बसला आहेत्यात पहिल्या सामन्यात काही परदेशी खेळाडू मुकण्याची शक्यता निर्माण झाली आहे
कॅरेबिनय प्रीमिअर लीगच्या ( CPL 2020) यंदाच्या पर्वात त्रिनबागो नाइट रायडर्स ( Trinbago Knight Riders) संघानं जेतेपद पटकावलं. कर्णधार किरॉन पोलार्डनं अंतिम सामन्यात डॅरेन सॅमीच्या सेंट ल्युसीआ झौक्स ( St Lucia Zouks) संघाच्या फलंदाजांना घाम फोडला. नाइट रायडर्सचे हे चौथे CPL जेतेपद आहे. याआधी त्यांनी 2015, 2017 व 2018 मध्ये जेतेपद पटकावले होते. नाइट रायडर्सच्या या विजयात महत्त्वाचा वाटा उचलणारा आणि ट्वेंटी-20त भीमपराक्रम करणारा ड्वेन ब्राव्हो दुबईत दाखल झाला आहे. चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super Kings) संघानं त्याचं भन्नाट स्वागत केलं.
IPL 2020 साठी KKRनं अमेरिकेहून गोलंदाज मागवला; 140kphच्या वेगानं करतो मारा, Video
भीषण अपघातात क्रिकेटपटू गंभीर जखमी; दोन्ही हात व पायांवर करावी लागेल शस्त्रक्रिया?
सीपीएलमध्ये नाइट रायर्डसचे प्रतिनिधिव्त करणाऱ्या ब्राव्होनं सेंट ल्युसीआ झौक्सविरुद्धच्या साखळी सामन्यात भीमपराक्रम केला. 2003मध्ये ट्वेंटी-20 फॉरमॅट अस्तिस्ताव आला आणि 17 वर्ष कोणालाही न जमलेला पराक्रम आज ब्राव्होनं करून दाखवला. ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये 500 विकेट्स घेणारा तो पहिला गोलंदाज ठरला. त्यानं 459 सामन्यांत 500 विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. लसिथ मलिंगा 390 विकेट्ससह दुसऱ्या क्रमांकावर आहे.
500 विकेट्स घेण्याचा पहिला मान
प्रथम श्रेणी - विलियम लिलीव्हाईट ( 1837)
लिस्ट ए - जॉन लेव्हर ( 1983)
कसोटी - कर्टनी वॉल्श ( 2001)
वन डे - वसीम अक्रम ( 2003)
ट्वेंटी-20 - ड्वेन ब्राव्हो ( 2020)
सीपीएल गाजवल्यानंतर ब्राव्हो IPL 2020साठी दुबईत दाखल झाला. नियमानुसार त्याला 6 दिवस आयसोलेशनमध्ये रहावे लागेल. तत्पूर्वी त्याची त्याची तीनदा कोरोना चाचणी करण्यात येईल आणि तीनही रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतरच त्याला मैदानावर उतरण्याची परवानगी मिळेल. ब्राव्होसह CSKचे मिचेल सँटनर आणि इम्रान ताहीर हेही CPLमध्ये खेळले होते आणि तेही दुबईत दाखल झाले आहेत.
CSKचे जोश हेझलवूड आणि सॅम कुरन हे सध्या ऑस्ट्रेलिया-इंग्लंड मालिकेत खेळत आहेत आणि 17 किंवा 18 सप्टेंबरला ते दुबईत येणे अपेक्षित आहेत. त्यामुळे त्यांना सुरुवातीच्या काही सामन्यांना मुकावे लागेल.
ब्राव्होची IPLमधील कामगिरी
ड्वेन ब्राव्होनं 134 सामन्यांत 1483 धावा केल्या आहेत आणि त्यात 116 चौकार व 61 षटकारांचा समावेश आहे. त्याच्या नावावर 147 विकेट्सही आहेत.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
IPL 2020मध्ये 'Purple Cap'च्या शर्यतीत पाच दावेदार; कोण मारेल बाजी?
IPL 2020च्या पहिल्या सामन्यापेक्षाही चर्चा रंगलीय 'या' सुंदरीची; पाहा फोटो
IPL 2020 : रोहित शर्मासह Mumbai Indiansच्या खेळाडूंची पुन्हा झाली कोरोना टेस्ट; पाहा व्हिडीओ
IPL 2020आधी विराट कोहलीनं स्वतःला लिहिलं भावनिक पत्र; हा Video तुम्हालाही इमोशनल करेल
आनंद पोटात मावेना... विराट कोहलीची IPL 2020 जेतेपदवाली Feeling; पाहा भन्नाट Video
चेन्नई सुपर किंग्सचं वेळापत्रक ( Chennai Super Kings Schedule in IPL 2020)
19 सप्टेंबर - शनिवार - चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, अबु धाबी
22 सप्टेंबर, मंगळवार - राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, शाहजाह
25 सप्टेंबर, शुक्रवार - चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, दुबई
2 ऑक्टोबर, शुक्रवार - चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, दुबई
4 ऑक्टोबर, रविवार - किंग्स इलेव्हन पंजाब विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, दुबई
7 ऑक्टोबर, बुधवार - कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, अबु धाबी
10 ऑक्टोबर, शनिवार - चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, दुबई
13 ऑक्टोबर, मंगळवार - सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, दुबई
17 ऑक्टोबर, शनिवार - दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, शारजाह
19 ऑक्टोबर, सोमवार - चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, अबु धाबी
23 ऑक्टोबर, शुक्रवार - चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, शारजाह
25 ऑक्टोबर, रविवार - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, दुपारी 3.30 वाजल्यापासून, दुबई
29 ऑक्टोबर, गुरुवार - चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, दुबई
1 नोव्हेंबर, रविवार - चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब, दुपारी 3.30 वाजल्यापासून, अबु धाबी
Web Title: CSK all-rounder Dwayne Bravo gets a 'Champion Welcome' as he lands in UAE for IPL 2020, watch video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.