ठळक मुद्देमधल्या फळीतील प्रमुख फलंदाजासह रैनाकडे होती उपकर्णधाराची जबाबदारीसुरेश रैनानं माघार घेतल्यानं ही जबाबदारी कोणाकडे जाणार?
इंडियन प्रीमिअर लीगला ( आयपीएल ) सुरुवात होण्यापूर्वीच चेन्नई सुपर किंग्सला मोठा धक्का बसला. संघाचा उपकर्णधार सुरेश रैनानं वैयक्तिक कारणास्तव आयपीएलमधून माघार घेतली. त्यात चेन्नईचे दोन खेळाडू दीपक चहर आणि ऋतुराज गायकवाड यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आढळला. त्यांच्यासह चेन्नईच्या सपोर्ट स्टाफमधीलही सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळले. त्यामुळे आता संघातील अनुभवी फिरकी गोलंदाज हरभजन सिंगही माघार घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.
सुरेश रैनाची उणीव फलंदाजीच्या क्रमवारीत जाणवेलच, परंतु त्यासह तो संघाचा उपकर्णधार आहे आणि संघाच्या निर्णयातही त्याचा महत्त्वाचा वाटा असायचा. आता रैना नसल्यानं नेतृत्वाचा संपूर्ण भार महेंद्रसिंग धोनीच्या खांद्यावर आला आहे. त्यामुळेच एका चाहत्यानं रैना नाही, तर उपकर्णधार कोण, असा सवाल केला. त्यावरून CSKच्या ट्विटर हँडलवरून भन्नाट उत्तर दिलं गेलं. त्या उत्तरातून चाहत्यांना स्पष्ट संकेतही मिळाला आहे.
CSKनं ट्विट केलं की,'हुशार कर्णधार असताना घाबरण्याची गरज काय?' 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत आयपीएल खेळवण्यात येणार आहे.
CSKच्या व्हॉट्सअप ग्रुपमधून सुरेश रैनाची हकालपट्टी
मायदेशात परतलेल्या रैनाची CSKच्या व्हॉट्सअप ग्रुपमधून हकालवट्टी करण्यात आलेली आहे. ''सुरेश रैनानं वैयक्तिक कारणास्तव भारतात परतण्याचा निर्णय घेतला आहे आणि तो आयपीएलच्या यंदाच्या मोसमात खेळणार नाही. रैना आणि त्याच्या कुटुंबीयांना चेन्नई सुपर किंग्सचा पूर्ण पाठींबा आहे,''असे CSKचे मुख्य कार्यकारी अधिकारी केएस विश्वनाथन यांनी सांगितले होते. CSKचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीसह हॉटेल रुमवरून वाद झाल्यानं रैना मायदेशी परतला अशीही चर्चा होती, परंतु आता रैनानं ती अफवा असल्याचे स्पष्ट केलं.
दरम्यान, InsideSportच्या वृत्तानुसार 33 वर्षीय रैनाची संघाच्या व्हॉट्सअप ग्रुपमधून हकालपट्टी करण्यात आली आहे आणि आता रैनानं संघ व्यवस्थापनाकडे माफी मागितली आहे. ''रैनानं दुबई सोडल्यानंतर त्याची संघाच्या व्हॉट्सअप ग्रुपमधून हकालपट्टी केली गेली. त्यानं आता संघाचे सीईओ, महेंद्रसिंग धोनी आणि प्रशिक्षक फ्लेमिंग यांच्याशी चर्चा केली आणि पुनरागमनाबाबत विचारणआ केली,''असे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे आता कर्णधार धोनीच्या हाती रैनाच्या भवितव्याचा निर्णय आहे.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
नाइट रायडर्स संघातला 48 वर्षांचा तरुण; जाँटी ऱ्होड्स स्टाईल घेतली कॅच, पाहा व्हिडीओ
संजय राऊतांनी शिवसेनेचं खरं रूप दाखवलं; कंगना Vs. सेना सामन्यात बबिता फोगाटची उडी
IPL 2020 : CSKच्या व्हॉट्सअप ग्रुपमधून सुरेश रैनाची हकालपट्टी; महेंद्रसिंग धोनीच्या हाती अंतिम निर्णय
IPL 2020 : आयपीएलमधील कोरोना सदस्यांचा आकडा 14 झाला, आणखी एकाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह
Web Title: CSK Give Witty Reply To Twitter Follower Asking About Team's Vice-captain After Raina Exit
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.