CSK Vs DC : "बुलेट ट्रेन येईल, पण MS Dhoni चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येणार नाही; मोदी जी आता तुम्हीच समजवा"

CSK Vs DC : अर्धशतकवीर पृथ्वी शॉ ( Pritvi Shaw) याला मॅन ऑफ दी मॅचने गौरविण्यात आले. 176 धावांचे लक्ष्य डोळ्यासमोर असताना आणि धावा व चेंडू यांचे अंतर वाढत जात असूनही महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आता.

By स्वदेश घाणेकर | Published: September 26, 2020 04:04 PM2020-09-26T16:04:51+5:302020-09-26T16:05:36+5:30

whatsapp join usJoin us
CSK Vs DC : MS Dhoni did not come to bat at number 4; Virender Sehwag Say Modiji ask him to come early, Watch Video  | CSK Vs DC : "बुलेट ट्रेन येईल, पण MS Dhoni चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येणार नाही; मोदी जी आता तुम्हीच समजवा"

CSK Vs DC : "बुलेट ट्रेन येईल, पण MS Dhoni चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येणार नाही; मोदी जी आता तुम्हीच समजवा"

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Indian Premier League ( IPL 2020) च्या 13व्या पर्वात शुक्रवारी दिल्ली कॅपिटल्सने ( Delhi Capitals) गत उपविजेत्या चेन्नई सुपर किंग्सला ( Chennai Super Kings) पराभूत करून सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली. दिल्ली कॅपिटल्सचा ( DC) हा सलग दुसरा विजय असून त्यांनू IPL Point Table ( गुणतक्त्यात) 4 गुणांसह अव्वल स्थानावर झेप घेतली आहे. अर्धशतकवीर पृथ्वी शॉ ( Pritvi Shaw) याला मॅन ऑफ दी मॅचने गौरविण्यात आले. 176 धावांचे लक्ष्य डोळ्यासमोर असताना आणि धावा व चेंडू यांचे अंतर वाढत जात असूनही महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आता. त्यामुळे पुन्हा वीरेंद्र सेहवागनं ( Virender Sehwag) नाराजी व्यक्त करून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धोनीला समजावण्याची विनंती केली आहे. 

IPL 2020 : CSKचे बुडते जहाज वाचवण्यासाठी सुरेश रैना कमबॅक करणार? फ्रँचायझीने दिले महत्त्वाचे अपडेट्स

संयमी सुरुवातीनंतर शिखर धवन आणि पृथ्वी शॉ यांनी चांगली फटकेबाजी केली. त्यानंतर श्रेयस अय्यर व रिषभ पंत यांनी दमदार खेळ करताना दिल्लीला समाधानकारक पल्ला गाठून दिला. पृथ्वी शॉने 64 धावा चोपल्या, तर शिखर धवन आणि रिषभ पंत यांच्या अनुक्रमे 35 व 37 धावांचे योगदान दिले. दिल्लीनं 20 षटकांत 3 बाद 175 धावा केल्या. अखेरच्या षटकात 14 धावा चोपल्या गेल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्सकडूCSKने 20 षटकांत 7 बाद 131 धावा केल्या. DC ने हा सामना 44 धावांनी जिंकला. पण, या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सच्या ( DC) मालकांच्या कुटुंबीयांमध्ये उपस्थित असलेल्या एका व्यक्तीनं सर्वांचे लक्ष वेधले.न फॅफ डू प्लेसिसची ( 43) एकाकी झुंज पाहायला मिळाली, तर कागिसो रबाडाच्या सर्वाधिक 3 विकेट्स, नॉर्ट्जेला दोन विकेट्स घेतल्या. 

सेहवागनं त्याच्या फेसबूक अकाऊंटवर एक व्हिडीओ अपलोड करून CSKची चांगलीच फिरकी घेतली. तो म्हणाला की,''महेंद्रसिंग धोनी हट्टाला पेटला आहे. सामन्याची परिस्थिती पाहता त्यानं स्वतःच्या फलंदाजीच्या क्रमवारीत बदल करायला हवा. चेन्नईचा संघ संकटात होता, तरीही थाला ( MS Dhoni) फलंदाजीला लवकर आला नाही. एकवेळ बुलेट ट्रेन येईल, परंतु धोनी चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येणार नाही. मोदीजी तुम्हीच त्याला समजवा.'' 

पाहा व्हिडीओ...


 

अन्य महत्त्वाच्या बातम्या 

इंडियन प्रीमिअर लीग की Injury Premier League? आतापर्यंत 8 खेळाडू झाले दुखापतग्रस्त! 

CSK vs DC सामन्यात 'तिने' सर्वांचे लक्ष वेधले, नेटिझन्स सर्च इंजिनवर तुटून पडले

 

Web Title: CSK Vs DC : MS Dhoni did not come to bat at number 4; Virender Sehwag Say Modiji ask him to come early, Watch Video 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.