कोरोना व्हायरसमुळे क्रिकेट स्पर्धा रद्द झाल्यामुळे ऑस्ट्रेलियन सलामीवीर डेव्हिड वॉर्नर टिकटॉक व्हिडीओ अपलोड करून चाहत्यांचे मनोरंजन करत आहे. टिकटॉकवर त्याचे 5 लाख फॉलोअर्स आहेत आणि त्यातले बरेच फॉलोअर्स हे भारतीय आहेत. पण, आता भारताची सुरक्षा, सार्वभौमत्व आणि अखंडता यांना धोका ठरू शकणाऱ्या ५९ चिनी अॅपवर बंदी घालण्याचा निर्णय केंद्र सरकारने सोमवारी रात्री जाहीर केला. त्यात टीकटॉकया व्हिडीओ अॅपचाही समावेश आहे. त्यामुळे वॉर्नरच्या फॉलोअर्सची संख्या घटणार आहे. भारतातील टिकटॉक बंदीवर ऑस्ट्रेलियन सलामीवीरानं प्रतिक्रिया दिली.
त्यानं इंस्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आणि त्यावर चाहत्यानं टिकटॉक बंदीबाबत विचारलं. त्यावर वॉर्नर म्हणाला,''भारतात टिकटॉक बंदीवर मी काहीच करू शकत नाही. तो सरकारचा निर्णय आहे आणि भारतीय लोकांनी त्याचा आदर केला पाहीजे.''
ही अॅप वापरू नका!
टिकटॉक, शेअरइट, किवी, यूसी ब्राऊझर, बायडू मॅप, शेइन, क्लॅश ऑफ किंग्स, डीयू बॅटरी सेव्हर, हॅलो, लायकी, यूकॅम मेकअप, मी कम्युनिटी, सीएम ब्राऊझर्स, व्हायरस क्लिनर, एपीयूएस ब्राऊझर, रोमवुई, क्लब फॅक्टरी, न्यूजडॉग, वुईचॅट, यूसी न्यूज, क्यूक्यू मेल, वेईबो, झेंडर, क्यूक्यू म्युझिक, क्यूक्यू न्यूजफिड, बिगो लाइव्ह, सेल्फीसिटी, मेल मास्टर, पॅरलल स्पेस, माय व्हिडिओकॉल झिओमी,
वुई सिंक, ईएस फाईल एक्प्लोरर, ब्युटीप्लस, व्हिवा व्हिडिओ क्यूयू व्हिडिओ इंक, मीटू, व्हिगो व्हिडिओ, न्यू व्हिडिओ स्टेटस, डीयू रेकॉर्डर, व्हॉल्ट हाईड, कॅचे क्लीनर डीयू अॅप स्टुडिओ,डीयू क्लीनर, डीयू ब्राऊझर, हॅगो प्ले विथ न्यू फ्रेन्डस, कॅम स्कॅनर, क्लीन मास्टर चिताह मोबाईल, वंडर कॅमेरा, फोटो वंडर, क्यू क्यू प्लेअर, वुई मीट, स्वीट सेल्फी, बैदू ट्रान्सलेट, वीमेट, क्यू क्यू इंटरनॅशनल, क्यू क्यू सेक्युरिटी सेंटर, क्यू क्यू लॉन्चर, यू व्हिडिओ, व्ही प्लाय स्टेटस व्हिडिओ, मोबाईल लेजंड््स आणि डीयू प्रायव्हसी.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
महेंद्रसिंग धोनी-साक्षीच्या लग्नाला 10 वर्ष पूर्ण; पाहा त्यांच्या लग्नातील Unseen Photo!
सचिन तेंडुलकरनं टेनिस स्टार रॉजर फेडररकडे मागितला सल्ला; पाहा Video
दिग्गजांशी तुलना करण्याची तुझी लायकी नाही; पाकिस्तानच्या कर्णधाराला घरचा आहेर
Photo : महेंद्रसिंग धोनीच्या फार्म हाऊसचा थाटच न्यारा; 7 एकर परिसरात बांधलाय स्वप्नांचा बंगला!
पाकिस्तान क्रिकेट संघाला भीकेचे डोहाळे; इंग्लंड दौऱ्यावर स्पॉन्सर्स मिळेना!
Web Title: David Warner reacts to TikTok ban in India, sends message to his fans in the country
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.