आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक काळ असा होता की दोन वेगवान गोलंदाजांमध्ये वाऱ्याच्या वेगाशी स्पर्धेची जणू पैजच लागली होती. एक होता पाकिस्तानची रावळपिंडी एक्स्प्रेस म्हणून ओळखला जाणारा शोएब अख्तर, तर दुसरा होता ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज ब्रेट ली.
डेव्हिड वॉर्नर, स्मिथही IPL मधून माघार घेण्याची शक्यता, ऑस्ट्रेलियामध्ये एन्ट्री बंद होण्याची भीती
सध्या गोलंदाजीत अनेक बदल झालेत. चेंडूच्या वेगापेक्षा सध्या व्हेरिएशनवर भर देण्याचा ट्रेंड जागतिक क्रिकेटमध्ये सुरू झालाय. पण समोर उभ्या फलंदाजांच्या छातीत धडकी भरवणारे हे दोन गोलंदाज असे होते की जे गोलंदाजीसाठी नुसते धावले तरी वाऱ्याच्या वेगाशी स्पर्धा करायचे. चेंडूच्या वेगाचा 100mph टप्पा कोण गाठतो याची जणू स्पर्धाच दोघांमध्ये होती.
कोरोना संकटाशी मुकाबला करणाऱ्या भारतीयांसाठी पाकिस्तानी कर्णधार बाबर आजमची प्रार्थना!
शोएब अख्तर आणि ब्रेट ली या दोघांनीही 100mph वेगाचा टप्पा गाठलाय. ब्रेट ली यानं वेस्ट इंडिज दौऱ्यात २००१-०२ साली टाकलेल्या एका चेंडूचा वेग 100.5 mph (161.8kph) इतका नोंदविण्यात आला होता. पण चॅनल-९ कडून चेंडूचा वेग मोजण्यात चूक झाली होती असं मान्य करण्यात आलं होतं. तर शोएब अख्तरनंही २००२ साली 100mph वेगानं चेंडू टाकला होता. पण त्याही वेळेस चेंडूचा वेग मोजणारी स्पीड गन मशीन विश्वासार्ह नसल्याचं सांगण्यात आलं. दोन्ही गोलंदाजांमध्ये वेगाची स्पर्धा काही थांबण्याचा नावं घेत नव्हती. (On this day Shoaib Akhtar goes past the 100 mph barrier)
भारतीय खेळाडूंचंही कोरोना लढ्यात मोठं योगदान; सचिन, विराट यांच्यासह अनेकांनी लावला हातभार!
अखेर तो दिवस उजाडला. ठिकाण होतं दक्षिण आफ्रिका आणि स्पर्धा होती २००३ सालाचा विश्वचषक. आजच्याच दिवशी म्हणजेच २७ एप्रिल २००३ रोजी इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात इंग्लंडच्या नासीर हुसेन यांनी प्रथम फलंदाजी स्वीकारली. पाकिस्तानच्या वकार युनुस यांनी पहिलं षटक वसीम अक्रम यांना दिलं. त्यानंतर सामन्याच्या चौथ्या षटकात शोएब अख्तरनं विक्रम रचला. चौथ्या षटकाचे पहिला पाच चेंडू निर्धाव गेले. फलंदाजी करत होता इंग्लंडचा माजी डावखुरा फलंदाज निक नाइट आणि षटकाचा सहावा चेंडू नाइटसाठी इतर चेंडूंसारखाच होता. पण यावेळी चेंडूचा वेग प्रचंड होता. त्यानं चेंडू लेग साइडच्या दिशेनं प्लेड केला. अख्तरच्या या चेंडूनंतर स्टेडियमवरील मोठ्या स्क्रीनवार चेंडूच्या वेगाचा आकडा दिसला 161.3 kmph आणि सर्वच आवाक् झाले. या चेंडूवर फलंदाज बाद झाला नव्हता तरी स्टेडियममध्ये उपस्थित प्रेक्षकांच्या टाळ्यांचा कडकडाट सुरू होता. कारण शोएब अख्तरनं क्रिकेटच्या इतिहासात एक नवा विक्रम रचला होता. अख्तरनंही प्रेक्षकांचं कौतुक स्वीकारात सर्वांवा अभिवादन केलं.
पाहा व्हिडिओ:
Web Title: On this day Shoaib Akhtar goes past the 100 mph barrier
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.