DC vs KXIP Latest News : KL Rahulनं झेल सोडला? पण, शिखर धवनचा 'पोपट' झाला, भोपळ्यावर माघारी परतला

DC vs KXIP Latest News : आजचा सामना हा किंग्ज ईलेव्हनचा कर्णधार के.एल.राहुल याचा कर्णधार म्हणून पहिला सामना आहे.

By स्वदेश घाणेकर | Published: September 20, 2020 07:57 PM2020-09-20T19:57:30+5:302020-09-20T19:58:03+5:30

whatsapp join usJoin us
DC vs KXIP Latest News : Delhi Capitals start with a mix-up, Shikhar Dhawan back to the hut with a duck, watch Video | DC vs KXIP Latest News : KL Rahulनं झेल सोडला? पण, शिखर धवनचा 'पोपट' झाला, भोपळ्यावर माघारी परतला

DC vs KXIP Latest News : KL Rahulनं झेल सोडला? पण, शिखर धवनचा 'पोपट' झाला, भोपळ्यावर माघारी परतला

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2020 DC vs KXIP Latest News : इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2020) 13व्या पर्वातील दुसरा सामना आज दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर ( Dubai International Cricket Stadium ) रंगणार आहे. दिल्ली कॅपिटल्स ( Delhi Capitals) आणि किंग्स इलेव्हन पंजाब ( Kings XI Punjab) यांच्यात सुरू झाला आहे. KXIPने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीला आलेल्या DCला दुसऱ्याच षटकात झटका बसला. DCचा सलामीवीर शिखर धवन ( Shikhar Dhawan) याचा मोहम्मद शमीच्या ( Shami) गोलंदाजीवर पोपट झाला अऩ् तो भोपळाही न फोडता माघारी परतला. ( IPL 2020 Live Updates, Click here)

लोकेश राहुलची आजच्या सामन्यात अ‍ॅडम गिलख्रिस्टच्या 'Unique' विक्रमाशी बरोबरी 

आजचा सामना हा किंग्ज ईलेव्हनचा कर्णधार के.एल.राहुल याचा कर्णधार म्हणून पहिला सामना आहे. आयपीएल एकदाही न जिंकलेल्या दोन संघांची ही लढत आहे. दोन्ही संघाचे कर्णधार , के.एल.राहुल (वय 28) व श्रेयस अय्यर (वय 25) हे यंदाच्या आयपीएलमधील तुलनेने सर्वात तरुण कर्णधार आहेत. त्यामुळे या दोन्ही युवा कर्णधारांच्या कामगिरीकडे सर्वांच्या नजरा आहे. उभय संघ 24वेळा समोरासमोर आले आणि त्यात सर्वाधिक 14वेळा पंजाबनं ( KXIP) बाजी मारली आहे. DCला 10 सामने जिंकता आले. या दोन संघातील गेल्या पाच पैकी चार लढती पंजाबने जिंकल्या आहेत. शेवटची लढत मात्र दिल्लीने जिंकली होती. ( IPL 2020 Live Updates, Click here

IPL 2020 MI vs CSK : महेंद्रसिंग धोनीनं IPLमधून माघार घेणाऱ्या सुरेश रैनाचे कान टोचले? म्हणाला...

आयपीएलमधील सर्वात तरुण कर्णधार
1) विराट कोहली- 22 वर्ष 187 दिवस
2) स्टिव्ह स्मिथ- 22 वर्ष 344 दिवस
3) सुरेश रैना- 23 वर्ष 112 दिवस
4) श्रेयस अय्यर- 23 वर्ष 141 दिवस
5) दिनेश कार्तिक- 24 वर्ष 292 दिवस

2018 व 2019 च्या आयपीएलमध्ये मिळून हजाराच्यावर धावा केलेले तीन फलंदाज या सामन्यात असतील. 
के. एल. राहुल- 1252 धावा
ऋषभ पंत- 1172 धावा
शिखर धवन- 1018 धावा

मोहम्मद शमीच्या त्या षटकात काय झालं?
शमीनं ( Shami) टाकलेल्या दुसऱ्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर धवनचा झेल लोकेश राहुलनं सोडला. तो झेल होता की नाही हा चर्चेचा विषय आहे. पण, त्यानंतर धवन एक धाव घेण्यासाठी पुढे धावला. पृथ्वी शॉने त्याला माघारी जा असे सांगण्यापूर्वी राहुलनं ( KL) चेंडू पुन्हा हातात घेतला अन् के गौवथमकडे टाकला. त्यानं लगेच धवनला धावबाद केले. धवनला भोपळाही न फोडता माघारी जावं लागलं. ( IPL 2020 Live Updates, Click here)

पाहा व्हिडीओ...
 

KL Rahul ने पाहा कोणता विक्रम केला?
IPLमध्ये कर्णधार, यष्टीरक्षक आणि सलामीवर अशा तिहेरी भूमिकेत दिसणारा लोकेश राहुल ( KL Rahul) हा पहिलाच भारतीय खेळाडू आहे. यापूर्वी ऑस्ट्रेलियाच्या गिलख्रिस्टनं हा तीन भूमिका IPLमध्ये पार पाडल्या होत्या. गिलख्रिस्टने IPLचे सहा पर्व खेळले आणि त्यात त्यानं डेक्कन चार्जर्स आणि किंग्स इलेव्हन पंजाब ( KXIP) यांचे प्रत्येकी 3 पर्वात प्रतिनिधित्व केले. गिलख्रिस्टनं त्याच्या 82व्या IPL सामन्यात प्रथमच तिहेरी भूमिका पार पाडली होती.

अन्य महत्त्वाच्या बातम्या 

संजय मांजरेकरने ओढावला नवा वाद; अंबाती रायुडू, पीयूष चावला यांना म्हणाला 'Low Profile' क्रिकेटपटू

MI vs CSK Latest News : कोण हरलं, कोण जिंकलं? हे विसरा; खेळाडूंच्या वाढलेल्या 'पोटा'वरून रंगलीय चर्चा 

ख्रिस गेलची विश्वविक्रमाडे वाटचाल; दिल्लीसमोर त्याला रोखण्याचे आव्हान

दिल्ली-पंजाब सामन्यात तीन मोठे विक्रम मोडणार; सुरेश रैनाला धक्का बसणार

IPL 2020 CSK : चेन्नई सुपर किंग्सचा स्टार अष्टपैलू ड्वेन ब्राव्हो दुसऱ्या सामन्यालाही मुकणार 

Web Title: DC vs KXIP Latest News : Delhi Capitals start with a mix-up, Shikhar Dhawan back to the hut with a duck, watch Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.