DC vs KXIP Latest News : सुपरओव्हरमध्ये किंग्स इलेव्हन पंजाबच्या नावावर झाली नकोशा विक्रमाची नोंद

हातातोंडाशी आलेला विजयाचा घास गमावणाऱ्या किंग्स इलेव्हन पंजाबच्या नावावर सुपरओव्हरमध्ये एका लारीजवाण्या विक्रमाची नोंद झाली आहे.

By बाळकृष्ण परब | Published: September 21, 2020 10:28 AM2020-09-21T10:28:42+5:302020-09-21T10:42:51+5:30

whatsapp join usJoin us
DC vs KXIP Latest News : Kings XI Punjab set a bad record in the Super Over | DC vs KXIP Latest News : सुपरओव्हरमध्ये किंग्स इलेव्हन पंजाबच्या नावावर झाली नकोशा विक्रमाची नोंद

DC vs KXIP Latest News : सुपरओव्हरमध्ये किंग्स इलेव्हन पंजाबच्या नावावर झाली नकोशा विक्रमाची नोंद

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देलढत टाय झाल्यानंतर झालेल्या सुपरओव्हरमध्ये किंग्स इलेव्हन पंजाबच्या नावावर एका नकोशा विक्रमाची नोंदकिंग्स इलेव्हन पंजाबसाठी ही सुपरओव्हर अत्यंत निराशाजनक ठरलीसुपरओव्हरमध्ये किंग्स इलेव्हन पंजाबचा संघ अवघ्या दोन धावांत गारद झाला


दुबई - शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या आणि टाय होऊन सुपर ओव्हरपर्यंत पोहोचलेल्या लढतीत काल दिल्ली कॅपिटल्सने किंग्स इलेव्हन पंजाबवर थरारक विज. मिळवला. मात्र हातातोंडाशी आलेला विजयाचा घास गमावणाऱ्या किंग्स इलेव्हन पंजाबच्या नावावर सुपरओव्हरमध्ये एका लारीजवाण्या विक्रमाची नोंद झाली आहे.

सुरुवातीपासूनच सी-सॉप्रणाणे दोन्हीकडे झुकत असलेल्या या सामन्यात कधी पंजाबचे पारडे जड ठरत होते तर कधी दिल्लीचा संघ वरचढ ठरत होता. पंजाबच्या भेदक माऱ्यानंतर स्टॉयनिसने तडाखेबंद खेळ करत दिल्लीला दीडशेपार नेले होते. नंतर या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबचा संघ अडखळला होता. मात्र मयांक अगरवालने तुफानी फटकेबाजी करत पंजाबला विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचवले होते. पण तीन चेंडून एका धावेची गरज असताना सामन्याचे चित्र फिरले. अष्टपैलू स्टॉयनिसने शेवटच्या दोन चेंडूत दोन दोन विकेट मिळवत सामना टाय केला.

लढत टाय झाल्यानंतर झालेल्या सुपरओव्हरमध्ये किंग्स इलेव्हन पंजाबच्या नावावर एका नकोशा विक्रमाची नोंद झाली आहे. विजय हातातोंडाशी आला असताना लढत टाय झाल्याने सुपरओव्हरमध्ये फलंदाजीसाठी उतरलेल्या किंग्स इलेव्हन पंजाबसाठी ही सुपरओव्हर अत्यंत निराशाजनक ठरली. सुपरओव्हरमध्ये किंग्स इलेव्हन पंजाबचा संघ अवघ्या दोन धावांत गारद झाला. त्यामुळे आयपीएलच्या इतिहासात सुपरओव्हरमध्ये सर्वात कमी धावा काढण्याच्या लाजीरवाण्या विक्रमाची पंजाबच्या नावावर नोंद झाली.

नियम काय सांगतो?
सुपर ओव्हरमध्ये एखाद्या संघाचे दोन विकेट गेल्यास ते षटक तेथेच समाप्त होते. लोकेश राहुलनं पहिल्या चेंडूवर दोन धाव घेतल्यानंतर कागिसो रबाडानं पुढील दोन चेंडूंवर राहुल आणि निकोलस पुरन यांना बाद केले. त्यामुळे ती सुपर ओव्हर तीन चेंडूंतच संपुष्टात आली आणि ऊउसमोर 3 धावांचे लक्ष्य ठेवले गेले.

असा रंगला सुपर ओव्हरचा थरार
कागिसो रबाडाच्या पहिल्या चेंडूवर लोकेश राहुलच्या दोन धावा
दुसऱ्या चेंडूवर लोकेश राहुल बाद
तिसऱ्या चेंडूवर निकोलस पूरण बाद
दोन विकेट्स गेल्यानं दिल्लीसमोर विजयासाठी 3 धावा
मोहम्मद शमीचा पहिला चेंडू निर्धाव
शमीच्या दुसरा चेंडू वाईड
 रिषभ पंतच्या दोन धावा
 
आयपीएलमधील सुपर ओव्हर
1-2009- राजस्थान विजयी
2- 2010- पंजाब विजयी
3- 2013- हैदराबाद विजयी
4- 2013- बंगलोर विजयी
5- 2014- राजस्थान विजयी
6- 2015- पंजाब विजयी
7- 2017- मुंबई विजयी
8- 2019- दिल्ली विजयी
9- 2019- मुंबई विजयी

Web Title: DC vs KXIP Latest News : Kings XI Punjab set a bad record in the Super Over

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.