DC vs KXIP Latest News : मोहम्मद शमीचा भेदक मारा; पण मार्कस स्टॉयनिसनं फिरवला सामना 

DC vs KXIP Latest News : मार्कस स्टॉयनिसनं अखेरच्या षटकात फटकेबाजी करताना DCला समाधानकारक पल्ला गाठून दिला. 

By स्वदेश घाणेकर | Published: September 20, 2020 09:24 PM2020-09-20T21:24:52+5:302020-09-20T21:26:05+5:30

whatsapp join usJoin us
DC vs KXIP Latest News :Marcus Stoinis' 20-ball 50 helps Delhi Capitals recover from 96/6 (16.1 overs) to 157/8  | DC vs KXIP Latest News : मोहम्मद शमीचा भेदक मारा; पण मार्कस स्टॉयनिसनं फिरवला सामना 

DC vs KXIP Latest News : मोहम्मद शमीचा भेदक मारा; पण मार्कस स्टॉयनिसनं फिरवला सामना 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देपहिल्या पॉवर प्लेमध्ये किंग्स इलेव्हन पंजाबचे वर्चस्वमोहम्मद शमीनं तीन विकेट्स घेत DCला दिले धक्केमार्कस स्टॉयनिसनं अखेरच्या षटकात तुफान फटकेबाजी

IPL 2020 DC vs KXIP Latest News : इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2020) 13व्या पर्वातील दुसरा सामना आज दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर ( Dubai International Cricket Stadium ) सुरू आहे. दिल्ली कॅपिटल्स ( Delhi Capitals) आणि किंग्स इलेव्हन पंजाब ( Kings XI Punjab) यांच्यात सुरू झाला आहे. KXIPने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. लोकेश राहुलच्या ( KL Rahul) नेतृत्वाखालील पहिल्याच सामन्यात KXIPच्या गोलंदाजांनी सुरेख कामगिरी केली. टीम इंडियाचा प्रमुख गोलंदाज मोहम्मद शमीनं ( Mohammed Shami) DCला धक्के दिले, त्यात पदार्पणवीर रवी बिश्नोई ( Ravi Bishnoi) याने DCच्या फलंदाजांना मोठे फटके मारू दिले नाही. पण, मार्कस स्टॉयनिसनं अखेरच्या षटकात फटकेबाजी करताना DCला समाधानकारक पल्ला गाठून दिला. 

शमीनं ( Mohammed Shami) टाकलेल्या दुसऱ्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर धवनचा झेल लोकेश राहुलनं सोडला. तो झेल होता की नाही हा चर्चेचा विषय आहे. पण, त्यानंतर धवन एक धाव घेण्यासाठी पुढे धावला. पृथ्वी शॉने त्याला माघारी जा असे सांगण्यापूर्वी राहुलनं ( KL) चेंडू पुन्हा हातात घेतला अन् के गौवथमकडे टाकला. त्यानं लगेच धवनला धावबाद केले. धवनला भोपळाही न फोडता माघारी जावं लागलं. त्यानंतर शमीनं चौथ्या षटकात DCचा सलामीवीर पृथ्वी शॉ ( Prithvi Shaw) आणि शिमरोन हेटमायर यांना माघारी पाठवले. पहिल्या पॉवर प्लेमध्ये दिल्लीच्या 3 बाद 23 धावा होत्या. 

कर्णधार श्रेयस अय्यर आणि रिषभ पंत यांनी दिल्लीचा डाव सावरला. या दोघांनी DCची विकेट्सची पडझड थांबवली. दोघांनी संयमी खेळ करताना दहा षटकांत 3 बाद 49 धावांपर्यंत मजल मारली होती. त्यानंतर श्रेयस अय्यर ( Shreyas Iyer) आणि रिषभ पंत ( Rishabh Pant) ने चौथ्या विकेटसाठी 73 धावांची भागीदारी करून DCचा डाव सावरला. पण, युवा वर्ल्ड कप गाजवणाऱ्या रवी बिश्नोईनं ही सेट जोडी तोडली. त्यानं पंतला त्रिफळाचीत केले. 

त्यानंतर KL Rahulने शमीला पुन्हा पाचारण केले आणि त्यानं त्याचा विश्वास सार्थ ठरवला. Shamiने अय्यरला बाद केले. शमीने षटकांत 15 धावा देताना 3 विकेट्स घेतल्या. IPLमधील त्याची ही सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी ठरली. यापूर्वी त्यानं 2019मध्ये MI विरुद्ध 21 धावांत 3 विकेट्स घेतल्या होत्या. पदार्पणवीर रवी बिश्नोईनंही 4 षटकांत 21 धावा देत 1 विकेट घेतली. त्यानंतर अखेरच्या षटकात मार्कस स्टॉयनिसने ( Marcus Stoinis ) फटकेबाजी करून DCला समाधानकारक पल्ला गाठून दिला.  मार्कसनं 20 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केलं. त्यानं 21 चेंडूंत 7 चौकार व 3 षटकार खेचून 53 धावा केल्या. दिल्लीनं 20 षटकांत 8 बाद 157 धावा केल्या. 

Web Title: DC vs KXIP Latest News :Marcus Stoinis' 20-ball 50 helps Delhi Capitals recover from 96/6 (16.1 overs) to 157/8 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.