अजिंक्य रहाणेसारखा मोठेपणा विराट कोहलीनं दाखवला का?; इंग्लंडच्या माजी कर्णधाराचा सवाल

भारतविरुद्ध इंग्लंड ( India vs England, 1st Test) पहिल्या कसोटी सामन्यात पाहुण्यांनी टीम इंडियाला चारीमुंड्या चीत केलं. फलंदाजी, गोलंदाजी व क्षेत्ररक्षण या तीनही आघाड्यांवर इंग्लंडचा खेळ भारी ठरला

By स्वदेश घाणेकर | Published: February 10, 2021 09:47 AM2021-02-10T09:47:02+5:302021-02-10T10:06:43+5:30

whatsapp join usJoin us
Did Joe Root receive signed jersey from Virat Kohli & Co.? Michael Vaughan asks Team India fans | अजिंक्य रहाणेसारखा मोठेपणा विराट कोहलीनं दाखवला का?; इंग्लंडच्या माजी कर्णधाराचा सवाल

अजिंक्य रहाणेसारखा मोठेपणा विराट कोहलीनं दाखवला का?; इंग्लंडच्या माजी कर्णधाराचा सवाल

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देपहिल्या कसोटीत इंग्लंडचा भारतावर २२७ धावांनी विजय१३ फेब्रुवारीपासून सुरू होणार दुसरी कसोटी

भारतविरुद्ध इंग्लंड ( India vs England, 1st Test) पहिल्या कसोटी सामन्यात पाहुण्यांनी टीम इंडियाला चारीमुंड्या चीत केलं. फलंदाजी, गोलंदाजी व क्षेत्ररक्षण या तीनही आघाड्यांवर इंग्लंडचा खेळ भारी ठरला. इंग्लंडनं विजयासाठी ठेवलेल्या ४२० धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाचा संघ १९२ धावांत तंबूत परतला अन् इंग्लंडनं २२७ धावांनी विजय मिळवन मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. या सामन्यानंतर कर्णधार विराट कोहलीनं ( Virat Kohli) भारताच्या आघाडीच्या फलंदाजांचे कान टोचले. इंग्लंडचा कर्णधार जो रूट ( Joe Root) याचा हा १०० वा सामना होता आणि त्यात त्यानं द्विशतक झळकावलं. या सामन्यानंतर विराट कोहलीनं उपकर्णधार अजिंक्य रहाणेसारखा मोठेपणा दाखवला का?; असा सवाल इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉन ( Michael Vaughan) यानं केला. सचिन तेंडुलकर-वीरेंद्र सेहवाग जोडी पुन्हा भारताचे प्रतिनिधित्व करणार 

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारतीय संघाचे नेतृत्व अजिंक्य रहाणेनं ( Ajinkya Rahane) केलं होतं. गॅबा कसोटीत ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर रहाणे आणि संघानं स्वाक्षरी केलेली जर्सी ऑसी फिरकीपटू नॅथन लियॉन ( Nathan Lyon) याला भेट दिली. लियॉनचा तो १००वा कसोटी सामना होता. सामना संपल्यानंतर अजिंक्यनं विजयी चषक उंचावण्यापूर्वी लियॉनला टीम इंडियाची जर्सी ज्यावर सर्व खेळाडूंनी स्वाक्षरी केली होती, ती भेट दिली. अजिंक्यची ही कृती पाहून लियॉन भारावला होता. आता रुटच्या १००व्या कसोटीनिमित्त विराटनं तसा मोठेपणा दाखवला का? असा प्रश्न वॉननं विचारला.  चेतावणी दिली होती; बेन स्टोक्सनं उडवला विराटचा त्रिफळा अन् 'ते' ट्विट व्हायरल, Video 

वॉननं ट्विट केलं की,'' गॅबा कसोटीतील विजयानंतर टीम इंडियानं १००वा कसोटी सामना खेळणाऱ्या नॅथन लियॉनला स्वाक्षरी केलेली जर्सी भेट दिली होती. आजच्या पराभवानंतर जो रूटला तशी भेट टीम इंडियानं दिली का? असं झालं असेल, याची खात्री नाही?; मला कुणी सांगेल का?'' चेन्नईतील पराभवानंतर विराट कोहलीनं दिलं 'हे' कारण, म्हणाला...


वॉननं हे ट्विट करून विराट कोहलीच्या खिलाडूवृत्तीबाबत शंका उपस्थित केली आहे.  

टीम इंडियाचा डाव गडगडला...
१ बाद ३९ वरून पाचव्या दिवसाची सुरुवात केल्यानंतर पहिली विकेट ही चेतेश्वर पुजाराची ( १५) गेली. त्यानंतर जेम्स अँडरसननं एकाच षटकात गिल ( ५०) व रहाणे (०) यांचा त्रिफळा उडवला. रिषभ पंत (११) व वॉशिंग्टन सुंदर ( ०) हेही झटपट माघारी परतले. विराटनं १०४ चेंडूंत ७२ धावा केल्या, परंतु त्याची खेळी व्यर्थ ठरली. स्टोक्सनं विराटचा त्रिफळा उडवला. त्यानंतर टीम इंडियाचे शेपूट लगेच गुंडाळले गेले. ४२० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाचा दुसरा डाव १९२ धावांवर गडगडला.  

लियॉननं मानले होते आभार...

''अजिंक्य रहाणे आणि टीम इंडियाला मालिका विजयाबद्दल मनःपूर्वक आभार. अजिंक्य दाखवलेल्या खिलाडूवृत्तीचेही आभार आणि टीम इंडियाच्या खेळाडूंची स्वाक्षरी असलेली जर्सी देऊन तुम्ही दाखवलेल्या प्रेमाचेही आभार,''असे लियॉननं लिहिले. 
 

Web Title: Did Joe Root receive signed jersey from Virat Kohli & Co.? Michael Vaughan asks Team India fans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.