चीनच्या सीमेवरील वाढता तणाव लक्षात घेऊन भारतीय दलाने केलेली खास विनंती मान्य करून फ्रान्सने राफेल लढाऊ विमानांच्या पहिल्या तुकडीत 5 विमानांची पाठवणी केली आहे. बहुप्रतिक्षीत असलेल्या या राफेल विमानांचं भारताच्या अंबाला विमानतळावर आगमन झालं असून भारतीयांकडून वेलकम टू इंडिया म्हणत राफेलचं स्वागत करण्यात येत आहे. राफेल विमानांचं भारतात लँडिंग झाल्यानंतर भारताच्या क्रिकेटपूटनं केलंलं ट्विट सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे.
भारताच्या वर्ल्ड कप विजेत्या खेळाडूनं गावात उघडलंय कोव्हिड सेंटर; गंभीर, युवीनं केलं सॅल्यूट!
सचिन तेंडुलकर शतक तर करायचा, पण...; कपिल देव यांनी मांडलं परखड मत
राफेल विमानांमुळे भारताच्या हवाई दलाची ताकद मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. विशेष म्हणजे भारतात येणाऱ्या राफेल लढाऊ विमानांकडे मोठ्या जबाबदाऱ्या सोपवण्यात येणार आहेत. अंबाला एअरफोर्स स्टेशनवर भारतीय हवाई दलाची ही नवीन राफेल लढाऊ विमानं तैनात केली जाणार आहेत. राफेलसारख्या प्राणघातक आणि अत्याधुनिक लढाऊ विमानांना तैनात करण्यासाठी केवळ अंबालाच का निवडले गेले. कारण अंबाला अशी जागा आहे जिथून आपल्या देशातील दोन्ही शत्रूंना काही मिनिटांत धुळीस मिळवता येऊ शकते.
भारताचा क्रिकेटपटू मनोज तिवारीनं ट्विट केलं की,''राफेल विमान भारतात दाखल झाल्याचे समजताच शेजारील राष्ट्रांमध्ये 8.5 रिक्टर सेल्सचा भूकंप नक्की झाला असेल. भारतीय हवाई दलाची ताकद आणखी वाढली आहे. आता शेजारील राष्ट्र भारताला डिवचण्याची चूक करणार नाहीत, याची मला खात्री आहे.''
शिखर धवन, गौतम गंभीर यांनीही ट्विट केलं.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
'उल्टा चष्मा'मधल्या जेठालालची 'बबिता' होती पाकिस्तानी खेळाडूच्या प्रेमात!
KKRला पहिल्यांदा IPL चॅम्पियन बनवणाऱ्या खेळाडूची निवृत्ती; प्रथम श्रेणीत 6482 धावा अन् 137 विकेट्स!
शॉक लगा... पाकिस्तानी क्रिकेटपटूसोबत घेतला सेल्फी, नंतर माहीत पडलं त्याला कोरोना झालाय!
एलिसा पेरीनं घेतला घटस्फोट, पण ट्रोल होतोय मुरली विजय; जाणून घ्या कारण!
IPL 2020: 125 भारतीय खेळाडू कमावणार 358 कोटी, तर 62 परदेशी खेळाडूंना मिळणार 197 कोटी!
ICC World Super League : 2023च्या वर्ल्ड कप पात्रता फेरीला गुरुवारपासून सुरुवात; जाणून घ्या मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक
Web Title: Earthquake has rattled our neighbouring countries after Rafale Jets landed in INDIA, Say Indian cricketer Manoj Tiwari
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.