इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल) 13व्या मोसमाच्या तयारीला वेग आला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं ( बीसीसीआय) केंद्र सरकारची परवानगी मिळवल्यानंतर सर्व फ्रँचायझींना आपापल्या खेळाडूंना एका ठिकाणी बोलावण्याची तयारी सुरू केली आहे. यंदाची आयपीएल संयुक्त अरब अमिराती ( यूएई) येथे होणार असल्यानं कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सर्व संघ महिनाभर आधी दाखल होणार आहेत. पण, अजूनही बीसीसीआय आणि फ्रँचायझींसमोर एक अडचण आहे. परदेशी खेळाडूंना आयपीएलसाठी यूएईत घेऊन येण्याचे आव्हान फ्रँचायझींना पेलावे लागणार आहे. त्यात आता चेन्नई सुपर किंग्स (CSK), रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( RCB), मुंबई इंडियन्स ( MI) आणि कोलकाता नाइट रायडर्स ( KKR) यांची डोकेदुखी वाढवणारी बातमी समोर आली आहे.
Bowl Out काय असतं रे भाऊ? पाक कर्णधाराकडे नव्हतं उत्तर; इरफान पठाणनं सांगितला किस्सा
पाकिस्तानचा पोपट झाला; 3911 दिवसांनी फलंदाजाला दिली संधी, पण त्याला फोडता आला नाही 'भोपळा'!
इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डानं ( इसीबी) शुक्रवारी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेचे वेळापत्रक जाहीर केलं. त्यानुसार इंग्लंड-ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन ट्वेंटी-20 आणि तीन वन डे सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. 24 ऑगस्टला ऑस्ट्रेलियाचा संघ इंग्लंडमध्ये रवाना होईल. इंग्लंड-पाकिस्तान यांच्यातील कसोटी मालिका 25 ऑगस्टला संपेल त्यानंतर तीन वन डे आणि तीन ट्वेंटी-20 सामने होणार आहेत. 1 सप्टेंबरला ही मालिका संपेल. त्यानंतर 4 सप्टेंबरपासून ऑस्ट्रेलियाविरुद्धची ट्वेंटी-20 मालिका सुरू होईल. तीन ट्वेंटी-20 व तीन वन डे सामन्यांची मालिका 16 सप्टेंबरपर्यंत रंगणार आहे. त्यामुळे इंग्लंड व ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना आयपीएलच्या पहिल्या आठवड्याला मुकावे लागणार हे निश्चित झाले आहे.
JIO ग्राहकांना मोठा धक्का; IPL 2020चे थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी करावी लागेल 'ही' गोष्ट!
IPL 2020ला एबी डिव्हिलियर्स, लसिथ मलिंगा यांच्यासह अनेक जण मुकणार? जाणून घ्या संपूर्ण लिस्ट!
ट्वेंटी-20 मालिका
- पहिला सामना - 4 सप्टेंबर
- दुसरा सामना - 6 सप्टेंबर
- तिसरा सामना - 8 सप्टेंबर
वन डे मालिका
- पहिला सामना - 11 सप्टेंबर
- दुसरा सामना - 13 सप्टेंबर
- तिसरा सामना - 16 सप्टेंबर
कोणत्या संघाला सर्वाधिक फटका?
आयपीएल 2020 साठी झालेल्या लिलावात ऑस्ट्रेलियाच्या 17 खेळाडूंना सर्वाधिक 86.7 कोटी इतकी रक्कम मिळाली. इंग्लंडच्या 11 खेळाडूंना 43.8 कोटी रुपये मिळाले.
- चेन्नई सुपर किंग्स - सॅम कुरन, जोश हेझलवूड, शेन वॉटसन
- दिल्ली कॅपिटल्स - अॅलेक्स करी, जेसन रॉय, मार्कस स्टॉयनिस
- कोलकाता नाइट रायडर्स - पॅट कमिन्स, ग्रीन , गर्नी, इयॉन मॉर्गन, टी बँटन
- किंग्स इलेव्हन पंजाब - ख्रिस जॉर्डन, ग्लेन मॅक्सवेल
- सनरायझर्स हैदराबाद - जॉनी बेअरस्टो, मिचेल मार्शस स्टँनलेक, डेव्हीड वॉर्नर
- राजस्थान रॉयल्स - जोफ्रा आर्चर, जोस बटलर, टॉम कुरन, स्टीव्ह स्मिथ, बेन स्टोक्स, अँड्य्रू टाय
- रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू - मोईन अली, अॅरोन फिंच, जे. फिलिफ, केन रिचर्डसन
- मुंबई इंडियन्स - कोल्टर नील, ख्रिस लीन.
शेन वॉटसन हा इंग्लंड-ऑस्ट्रेलया मालिकेचा भाग नसल्यानं तो दाखल होईल.
Web Title: ECB confirms Australia series, England & Australian cricketers will miss the first week of IPL 2020
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.