ICC World Test Championship 2021-23 : भारत-इंग्लंड कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात विराट कोहली अँड कंपनीच्या तोंडाशी आलेला विजयाचा घास पावसामुळे हिरावला गेला. भारताला विजयासाठी पाचव्या दिवशी १५७ धावाच करायच्या होत्या अन् ९ फलंदाज हाताशी होते. लोकेश राहुल बाद झाला असला तरी अखेरच्या दिवशी १५७ धावा करणे टीम इंडियासाठी सहज शक्य होते. पण, भारताला अखेरीस अनिर्णित निकालावर समाधान मानावे लागले अन् जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात दोन्ही संघांना ४-४ असे समान गुण मिळाले. पण, आयसीसीनं आज कारवाई करताना टीम इंडियासह यजमान इंग्लंडलाही धक्का दिला.
दुसऱ्या कसोटीला गुरुवारपासून सुरुवात होत आहे आणि त्याआधी आज दोन्ही संघांना धक्का बसला आहे. पहिल्या कसोटीत षटकांची गती संथ ठेवल्यामुळे दोन्ही संघांना आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणातील दोन गुण वजा करण्यात आले आहेत. त्यामुळे आता दोन्ही संघांच्या खात्यात २-२ गुण आहेत ( Both the teams now have two points each in the ICC World Test Championship 2021-23 standings heading into the second Test at Lord's.). गुण वजा करण्या व्यतिरिक्त दोन्ही संघांना मॅच फीमधील ४० टक्के रक्कम ही दंड म्हणून भरावी लागणार आहे. ( England were also fined 40% of their match fee for slow over-rate while Virat Kohli's India were also penalised 40% by match referee Chris Broad.)
पहिल्या कसोटीनंतर विराटनं व्यक्त केली नाराजी
विराट कोहली म्हणाला होता की,''तिसऱ्या व चौथ्या दिवशी पाऊस पडेल हे अपेक्षित होते आणि त्यानं पाचव्या दिवसाची निवड केली. जेव्हा आम्ही विजयाच्या समीप येणार होतो. आम्हाला दमदार सुरुवात करायची होती आणि पाचव्या दिवशी विजय मिळवण्याची संधी आहे, असे आम्हाला वाटत होते. आम्ही टॉपवर आहोत असेच वाटत होते, परंतु पाचव्या दिवशी खेळता आले नाही, ही लाजिरवाणी बाब म्हणावी लागेल.''
Web Title: England and India have been fined and docked two points each from their ICC World Test Championship 2021-23 tally for slow over-rates
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.