England vs Ireland 1st ODI: ICC Men's Cricket World Cup Super League ( आयसीसी वर्ल्ड कप सुपर लीग) मधील पहिल्याच मालिकेतील सलामीच्या सामन्यात इंग्लंडनं विजय मिळवला. इंग्लंडनं उत्तम सांघिक खेळाच्या जोरावर आयर्लंडवर 6 विकेट्स राखून विजय मिळवला. या विजयासह इंग्लंडनं आयसीसी वर्ल्ड कप सुपर लीगच्या गुणतालिकेत 10 गुणांची कमाई केली. इंग्लंडच्या डेव्हिड विलीनं आयर्लंडला दे धक्का देताना पाच विकेट्स घेतल्या. आयर्लंडचे 173 धावांचे लक्ष्य इंग्लंडनं 6 विकेट्स राखून पार केले. पण, या सामन्यात आयर्लंडच्या कर्टीस कॅम्फरनं वेगळाच पराक्रम केला.
England vs Ireland 1st ODI: आयसीसी वर्ल्ड कप सुपर लीगच्या गुणतालिकेत इंग्लंडनं उघडलं खातं!
आयर्लंड आणि इंग्लंड यांच्यातील ही मालिका वर्ल्ड कप सुपर लीगचा शुभारंभ आहे. विलीनं पहिल्याच षटकात आयर्लंडचा सलामीवीर पॉल स्ट्रीलिंगला माघारी पाठवले. त्यानंतर एकामागून एक धक्के देत विलीनं आयर्लंडच्या चार फलंदाजांना बाद केलं, साकीब महमूदनं एक विकेट घेत त्याला साथ दिली.आयर्लंडच्या 10 षटकांत 5 बाद 33 धावा झाल्या होत्या. पण, केव्हीन ओ'ब्रायन आणि कर्टीस यांनी सहाव्या 51 धावांची भागीदारी केली. केव्हीन 22 धावा करून माघारी परतला. त्यानंतर आलेला सिमी सिंगही (0) पहिल्याच चेंडूवर माघारी परतला. पण, कर्टीसनं आठव्या विकेटसाठी अँडी मॅकब्रीनसह अर्धशतकी भागीदारी केली. कर्टीस 118 चेंडूंत 4 चौकारासंह 59 धावांवर नाबाद राहिला. आयर्लंडचा संपूर्ण संघ 172 धावांत तंबूत परतला. विलीनं 30 धावांत 5 विकेट्स घेत कारकिर्दीतील सर्वोत्तम वैयक्तीक कामगिरी नोंदवली.
इंग्लंडनं हे लक्ष 27.5 षटकांत 4 विकेट्सच्या मोबदल्यात पार केले. सॅम बिलिंगने 54 चेंडूंत 11 चौकारांसह नाबाद 67 धावा केल्या, तर कर्णधार इयॉन बॉर्गननं 40 चेंडूंत 4 चौकार व 2 षटकारांसह नाबाद 36 धावा केल्या. आयर्लंडच्या क्रेग यंगनं इंग्लंडला सुरुवातीला दोन धक्के दिले. त्याऩंतर मॅकब्रीन आणि कॅम्फर यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. कॅम्फरनं इंग्लंडच्या टॉम बँटनला बाद करून एक वेगळाच विक्रम नावावर केला. कॅम्फरनं दक्षिण आफ्रिकेच्या 19 वर्षांखालील संघाचे प्रतिनिधित्व केलं आहे आणि युवा सामन्यात त्यानं बँटनची विकेट घेतली होती आणि आता आयर्लंडकडून खेळतानाही त्यानं बँटनला बाद केलं. शिवाय पदार्पणात अर्धशतक आणि 1 विकेट घेणारा कॅम्फर हा 17 वा खेळाडू ठरला.
Web Title: England vs Ireland 1st ODI: Curtis Campher is only the 17th player to score a fifty and take a wicket on ODI debut
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.