बोंबला! पाकिस्तान संघाची सर्व उपकरणे जप्त होणार; परवेझ मुशर्रफ यांचा करार महागात पडणार

England vs Pakistan : Pakistan team faced with legal threat of equipment being seized

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2020 10:18 AM2020-07-28T10:18:29+5:302020-07-28T10:19:15+5:30

whatsapp join usJoin us
England vs Pakistan : Pakistan team faced with legal threat of equipment being seized | बोंबला! पाकिस्तान संघाची सर्व उपकरणे जप्त होणार; परवेझ मुशर्रफ यांचा करार महागात पडणार

बोंबला! पाकिस्तान संघाची सर्व उपकरणे जप्त होणार; परवेझ मुशर्रफ यांचा करार महागात पडणार

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या पाकिस्तान क्रिकेट संघावर आणखी एक संकट आले आहे. पाकिस्तान सरकार आणि   ब्रॉडशीट LLC कंपनीतील जुन्या वादाचा फटका आता पाकिस्तान क्रिकेट संघाला बसणार आहे. या कंपनीनं इंग्लंड दौऱ्यावर आलेल्या पाकिस्तान संघाची सर्व उपकरणं जप्त करण्याची धमकी दिली आहे. ब्रॉडकास्टर LLCची थकित रक्कम पाकिस्तान सरकारनं अजून दिलेली नाही. त्यामुळे ब्रॉडशीट LLCनं एक प्रसिद्धी पत्रक जाहीर केले असून त्यात त्यांनी थकबाकी द्या अन्यथा पाकिस्तान संघाची सर्व उपकरणं जप्त करू, अशी धमकी दिली आहे. 

विराट कोहलीनं 'देसी गर्ल'ला टाकलं मागे! 

भारताचा माजी कर्णधार करतोय दगड फोडण्याचं काम; Sonu Soodनं पुढं केला मदतीचा हात!

ही धमकी मिळताच पाकिस्तान क्रिकेट मंडळानं ( पीसीबी) लंडन येथील पाकिस्तान दूतावासात धाव घेतली आणि हा वाद लवकरच सुटेल,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पाकिस्तान क्रिकेट संघ हा पीसीबीचे प्रतिनिधित्व करतो, पाकिस्तान राष्ट्राचे किंवा सरकारचे नाही, असा दावा पीसीबीकडून करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांना पाकिस्तान क्रिकेट संघाला अशा प्रकारे धमकी देण्याचा अधिकार नाही, असेही त्यांनी सांगितले. ब्रॉडशीट LLCनं पत्रात म्हटलं आहे की,''पाकिस्तान क्रिकेट संघ हा सरकारची मालमत्ता आहे आणि त्यामुळे त्यांच्याकडून थकीत रक्कम वसूल केली जाऊ शकते.''

पण, पीसीबीनं पाकिस्तान क्रिकेट संघ ही स्वायत्त मालमत्ता असल्याचे स्पष्ट केलं. त्यांनी सांगितले की,''ब्रॉडशीट LLC आणि इस्लामीक रिपल्बिक ऑफ पाकिस्तान व पाकिस्तानचे राष्ट्रीय उत्तरदायित्व ब्यूरो यांच्यात झालेल्या व्यवहाराशी पीसीबीचा काडीमात्र संबंध नाही.'' 

हे प्रकरण नक्की काय आहे?
2000मध्ये तत्कालीन पंतप्रधान परवेझ मुशर्रफ यांनी परदेशात पाकिस्तानी नागरिकांनी लपवलेल्या मालमत्तेचा तपास करण्यासाठी ब्रॉडशीटला नियुक्त केले होते. राष्ट्रीय उत्तरदायित्व ब्यूरो यांनी ब्रॉडशीटसोबतच्या करारावर हस्ताक्षर केले होते. 2003मध्ये तो करार संपुष्टात आला. त्यानंतर हा वाद आंतरराष्ट्रीय न्यायालयात गेला आणि 2018मध्ये ब्रॉडशीटच्या बाजूनं निकाल लागला. त्यामुळे पाकिसान राष्ट्रीय उत्तरदायित्व ब्यूरोला 33 मिलियन डॉलर देणे आहे.   
 

Web Title: England vs Pakistan : Pakistan team faced with legal threat of equipment being seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.