इंग्लंडनं दुसऱ्या कसोटीत विजय मिळवून वेस्ट इंडिजच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी मिळवली आहे. बेन स्टोक्सनं या सामन्यात 254 धावा करताना 3 विकेट्स घेत मॅन ऑफ दी मॅचचा पुरस्कार जिंकला. या कसोटीपूर्वी इंग्लंडला मोठा धक्का बसला होता. इंग्लंडचा प्रमुख गोलंदाज जोफ्रा आर्चर याला दुसऱ्या कसोटीतून वगळण्यात आले होते. आर्चरनं कोरोना व्हायरसमुळे आखलेल्या नियमांचे उल्लंघन केलं होतं. त्यामुळे त्याला पाच दिवसांच्या आयसोलेशनमध्ये जावे लागले होते आणि त्याची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्याचा रिपोर्ट मंगळवारी समोर आला आहे. (Jofra Archer has been cleared to re-join the England squad)
जोफ्रा आर्चरनं जैव सुरक्षा नियम मोडल्यामुळे त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली होती. आता त्याला पाच दिवस आयसोलेशनमध्ये रहावे लागले. त्याची दोनवेळा कोरोना चाचणी करण्यात आली. ''झालेल्या चुकीबद्दल मी माफी मागतो. मी स्वतःलाच नव्हे, तर संपूर्ण संघ आणि व्यवस्थापकीय सदस्यांना संकटात आणले. माझी चूक मी मान्य करतो आणि सर्वांची माफी मागतो,''असे आर्चर म्हणाला होता.(Jofra Archer has been cleared to re-join the England squad)
पहिल्या कसोटीनंतर सर्व खेळाडू साऊदॅम्प्टन येथून वेगवेगळ्या वाहनांतून मँचेस्टर येथे पोहोचायचे होते. पण, आर्चर थेट मँनचेस्टरला न जाता तेथून दोन तास दूर असलेल्या ब्रिगटन येथे आपल्या घरी गेला. त्या घरात त्याची गर्लफ्रेंड राहते आणि तिला भेटण्यासाठी तो तिथे गेल्याची चर्चा सुरू झाली आहे. इंग्लंडमधील अनेक वृत्तपत्रांनी तसा दावा केला आहे. जोफ्रानं पहिल्या कसोटीत 17 षटकांत 45 धावा देताना 3 विकेट्स घेतल्या होत्या. त्याचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला असून आता तो खेळाडूंसोबत सराव करू शकतो. (Jofra Archer has been cleared to re-join the England squad)
जोफ्राच्या येण्यानं तिसऱ्या कसोटीत संघ निवडताना डोकेदुखी ठरणार आहे. स्टुअर्ट ब्रॉड आणि ख्रिस बोक्स यांनी दमदार कामगिरी केली आहे. तिसऱ्या कसोटीत जोफ्रा आणि जेम्स अँडरसन यांचे कमबॅक अपेक्षित आहे. अशात मार्क वूड आणि सॅम कुरन यांना वगळण्यात येऊ शकते. ऑली स्टोन यानेही दुखापतीवर मात केली आहे. डॉम बेसच्या जागी जॅक लीचला संधी दिली जाऊ शकते. (Jofra Archer has been cleared to re-join the England squad)
पाकिस्तानला मोठा धक्का; चौथ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह सापडला गोलंदाज
आशिया चषक, ट्वेंटी-20 वर्ल्ड कप रद्द, तरीही 'IPL 2020'च्या मार्गातील अडथळे कायम!
Big News : सहा महिन्यांत दोन वेळा रंगणार IPL स्पर्धा; क्रिकेटप्रेमींसाठी खुशखबर
सौरव गांगुलीची विनंती क्रिकेट ऑस्ट्रेलियाने फेटाळली; टीम इंडियाला करावी लागणार 'ही' गोष्ट!
ICCच्या निर्णयानं 2023मध्ये भारतात होणाऱ्या वर्ल्ड कपमध्ये बदल; 36 वर्षांनी जुळून येईल योगायोग
बेन स्टोक्सचा पराक्रम; 14वर्षानंतर ICC Rankingमध्ये इंग्लंडच्या खेळाडूनं मिळवलं मानाचं स्थान
ICC World Test Championship: इंग्लंडची मोठी झेप; भारत अन् ऑस्ट्रेलियाच्या स्थानाला धोका?
Read in English
Web Title: England vs West Indias Test: Jofra Archer has been cleared to re-join the England squad, his second Covid-19 test come negative
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.