Corona Virus : इंग्लंडच्या खेळाडूनं वर्ल्ड कप जर्सी लाखांत विकली; हॉस्पिटल्सना केली मदत 

लंडन येथील रॉयल ब्रॉम्प्टन आणि हॅरेफिल्ड हॉस्पिटल्सना मदत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2020 12:18 PM2020-04-08T12:18:38+5:302020-04-08T12:19:29+5:30

whatsapp join usJoin us
England wicket-keeper batsman Jos Buttler raises £65,000 by auctioning World Cup final shirt svg | Corona Virus : इंग्लंडच्या खेळाडूनं वर्ल्ड कप जर्सी लाखांत विकली; हॉस्पिटल्सना केली मदत 

Corona Virus : इंग्लंडच्या खेळाडूनं वर्ल्ड कप जर्सी लाखांत विकली; हॉस्पिटल्सना केली मदत 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

कोरोना व्हायरसशी मुकाबला करण्यासाठी इंग्लंडचा यष्टिरक्षक-फलंदाज जोस बटलर यानं वर्ल्ड कप विजेत्या जर्सीचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानं या लिलावातून 80 हजार डॉलर म्हणजेच जवळपास 60 लाख रुपयांचा निधी जमा केला आहे. हा निधी त्यानं लंडन येथील रॉयल ब्रॉम्प्टन आणि हॅरेफिल्ड हॉस्पिटल्सना दान केला आहे.

लॉर्ड्सवर झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या अंतिम सामन्यात इंग्लंडला सुपर ओव्हरमध्येही विजय मिळवता आला नाही. सर्वाधिक चौकाराच्या नियमानं इंग्लंडला विजेता जाहीर केले. या ऐतिहासिक क्षणाची जार्सी बटलरने लिलावात ठेवली होती. त्यानं ही घोषणा करताना लिहीलं होतं की,''रॉयल ब्रॉम्प्टन आणि हॅरफिल्ड हॉस्पिटलच्या चॅरिटीसाठी वर्ल्ड कप अंतिम सामन्याच्या अंतिम सामन्यातील जर्सी लिलावात ठेवणार आहे. गत आठवड्यात या हॉस्पिटल्सनी मदतीचं आवाहन केलं होतं.''


त्याच्या या जर्सीसाठी 82 जणांनी बोली लावली आणि विजेत्यानं 65,100 पाऊंडमध्ये ती खरेदी केली. बटरलनं सांगितले की,''ही जर्सी माझ्यासाठी खास होती, परंतु संकटसमयी त्यातून मदत उभी केल्याचा मला आनंद होत आहे.'' 

अन्य महत्त्वाच्या बातम्या

'त्या' एका निर्णयामुळे भारतीय खेळाडूवरील संकट टळलं!

15 वर्षीय खेळाडूनं विकल्या त्याच्याकडच्या 102 ट्रॉफी; जमा केलेला निधी केला दान

पाकिस्तानच्या मदतीसाठी ब्रिटनचा आमीर खान सरसावला, करतोय धान्याचं वाटप

Read in English

Web Title: England wicket-keeper batsman Jos Buttler raises £65,000 by auctioning World Cup final shirt svg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.