ठळक मुद्देपाकिस्तानी क्रिकेट मंडळानं रविवारी ट्विट करून वाहिली श्रद्धांजली12 आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांत प्रतिनिधित्व केलेल्या खेळाडूचं निधन
पाकिस्तानी गोलंदाज मोहम्मद इरफान याच्या मृत्यूच्या चर्चा रविवारी दिवसभर सोशल मीडियावर रंगल्या होत्या. पाकिस्तान क्रिकेट मंडळानं ( पीसीबी) रविवारी त्यांच्या ट्विटर हँडलवर एक ट्विट केलं आणि त्यावरून हा गोंधळ सुरू झाला. नेटकऱ्यांनी पीसीबीचं ते ट्विट नीट वाचलं नाही आणि त्यामुळे मोहम्मद इरफानच्या मृत्यूच्या चर्चांना उधाण आलं. या चर्चांवर अखेर स्वतः गोलंदाज मोहम्मद इरफाननं स्पष्टिकरण देत आपण जीवंत असल्याचे सांगितले.
प्रथम श्रेणी क्रिकेटमधील सर्वाधिक उंच क्रिकेटपटू म्हणून इरफान ओळखला जातो. तो 7 फुट 1 इंचाचा आहे. रस्ता अपघातात त्याचं निधन झाल्याची चर्चा सुरू होती आणि यात तथ्य नसल्याचं त्यानं सांगितले. ''सोशल मीडियावर माझ्या निधनाची चुकीची आणि तथ्यहीन बातमी पसरवली जात आहे. त्यानं माझ्या कुटुंबीयांना आणि मित्रपरिवाराला प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागला आहे. माझा फोन सतत वाजत आहे. माझा कोणताही अपघात झालेला नाही आणि मी पूर्णपणे तंदुरुस्त आहे,''असे इरफाननं ट्विट केलं.
इरफाननं गतवर्षी अखेरचा आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20 सामना खेळला होता. त्यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 109 विकेट्स घेतल्या आहेत.
पीसीबीच्या ट्विटनं गोंधळपाकिस्तान क्रिकेट मंडळानं ट्विट केलं की,''पाकिस्तानच्या राष्ट्रीय कर्णबधिक संघाचा माजी खेळाडू मोहम्मद इरफान याचे निधन झाले. त्यानं 12 आंतरराष्ट्रीय सामन्यांत देशाचे प्रतिनिधित्व केले होते. त्याच्या कुटुंबीयांप्रती आम्ही शोक व्यक्त करतो.'' या ट्विटनंतर हा गोंधळ सुरू झाला.
Web Title: Fact Check : Pakistan bowler Mohammad Irfan confirms he is 'well' after rumours of death
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.