'तौबा तौबा' गाण्यावर केलेले रील भोवले; हरभजन, युवराज आणि रैनाविरोधात FIR दाखल

या तिन्ही क्रिकेटवटूंवर देशातील अपंग व्यक्तींचा अपमान केल्याचा आरोप आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2024 09:28 PM2024-07-16T21:28:56+5:302024-07-16T21:30:17+5:30

whatsapp join usJoin us
FIR filed against Harbhajan singh, Yuvraj singh and suresh Raina over reel video | 'तौबा तौबा' गाण्यावर केलेले रील भोवले; हरभजन, युवराज आणि रैनाविरोधात FIR दाखल

'तौबा तौबा' गाण्यावर केलेले रील भोवले; हरभजन, युवराज आणि रैनाविरोधात FIR दाखल

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Harbhajan Singh Yuvraj Singh Suresh Raina Tauba Tauba Song FIR: वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्स लीग 2024 च्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानचा पराभव केला. या विजयानंतर हरभजन सिंग, युवराज सिंग आणि सुरेश रैनाने 'तौबा तौबा' गाण्यावर रील बनवून अनोखे सेलिब्रेशन केले. पण, या सेलिब्रेशनवरुन वाद निर्माण झाला आहे. या रीलमध्ये दिव्यांग व्यक्तींचा अपमान केल्याचा आरोप या क्रिकेटपटूंवर करणयात आला आहे. तसेच, याप्रकरणी तिघांविरोधात FIR देखील दाखल करण्यात आली आहे.

पाकिस्तानवर मिळवलेल्या ऐतिहासिक विजयानंतर भज्जी आणि रैनासह युवराज सिंगने केलेले भन्नाट सेलिब्रेशन सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले. पण, यावर नेटकऱ्यांसह पॅरा बॅडमिंटन स्टार मानसी जोशीने आक्षेप नोंदवला. यानंतर हरभजनने सोशल मीडियावर माफी मागून व्हिडिओ डिलिटदेखील केला. पण, आता नॅशनल कौन्सिल फॉर प्रमोशन ऑफ एम्प्लॉयमेंट फॉर डिसेबल्ड पीपल (NCPEDP) ने तिघांविरोधात एफआयआर दाखल केला आहे.

हरभजनने इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर केला होता. इन्स्टाग्रामची मालकी 'मेटा'कडे असल्याने, 'मेटा इंडिया'विरोधातदेखील माहिती तंत्रज्ञान कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. एनसीपीईडीपीचे कार्यकारी संचालक अरमान अली यांनी या संपूर्ण प्रकरणावर एक निवेदन जारी केले आहे.

एफआयआर का नोंदवला गेला?
अरमान अली म्हणाले, हरभजन सिंग, युवराज सिंग आणि सुरेश रैना यांनी व्हिडिओतून अपंगांची खिल्ली उडवली आहे. भारतात राहणाऱ्या अंदाजे 10 कोटी अपंग लोकांचा हा अपमान आहे, असे मला वाटते. हरभजन सिंग हे राज्यसभेचे खासदार आहेत आणि त्यांनी अशाप्रकारे व्हिडिओ बनवने योग्य नाही. विशेषत: भारतात अपंगत्वाबाबत जागरुकतेचा फार मोठा अभाव आहे. तुम्ही लोकांची चेष्टा करत आहात, म्हणूनच मी एफआयआर दाखल केली आहे.

व्हिडिओ हटवून हरभजनने मागितली माफी
हरभजन सिंगने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हा व्हिडिओ डिलीट केला आहे. तसेच, याबाबत स्पष्टीकरण देताना म्हणाला की, इंग्लंडमध्ये चॅम्पियनशिप जिंकल्यानंतर सोशल मीडियावर 'तौबा तौबा'च्या आमच्या अलीकडील व्हिडिओंबद्दल अनेकांनी तक्रार केली. त्यांना मला सांगायचे आहे की, कोणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा हेतू नव्हता. आम्ही प्रत्येक व्यक्ती आणि समुदायाचा आदर करतो आणि हा व्हिडीओ केवळ मनोरंजनासाठी होता. सतत 15 दिवस क्रिकेट खेळल्यानंतर आमचे शरीर थकले होते, त्यामुळे आम्ही अशाप्रकारचा व्हिडिओ बनवला. कुणाच्या भावना दुखावल्या असतील, तर मी सर्वांची माफी मागतो. आम्ही कोणाचाही अपमान किंवा अपमान करण्याचा प्रयत्न करत नाही, असे भज्जी म्हणाला. 

 

Web Title: FIR filed against Harbhajan singh, Yuvraj singh and suresh Raina over reel video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.