पाकिस्तानकडून पराभूत झाल्यानंतर भारतीय खेळाडू आमची माफी मागायचे - शाहिद आफ्रिदी

40 वर्षीय आफ्रिदीनं पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलं..

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2020 11:29 AM2020-07-06T11:29:43+5:302020-07-06T11:30:48+5:30

whatsapp join usJoin us
Former Pakistan all-rounder Shahid Afridi has once again made a big claim on Indo-Pak rivalry | पाकिस्तानकडून पराभूत झाल्यानंतर भारतीय खेळाडू आमची माफी मागायचे - शाहिद आफ्रिदी

पाकिस्तानकडून पराभूत झाल्यानंतर भारतीय खेळाडू आमची माफी मागायचे - शाहिद आफ्रिदी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देपाकिस्तानचा माजी खेळाडूनं भारत-पाकिस्तान सामन्याबाबद केलं वादग्रस्त विधानकोरोनावर मात केल्यानंतर त्यानं काश्मीर मुद्द्यावरूनही केली होती टीका

पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदीनं पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलं आहे. आफ्रिदीनं नुकतीच कोरोनावर मात केली आहे. त्यानंतर त्यानं एका चॅनलला मुलाखत देताना भारत-पाकिस्तान क्रिकेटवर मोठ विधान केलं.  पाकिस्तान संघाकडून पराभूत झाल्यानंतर भारतीय खेळाडू आमच्याकडे क्षमा मागायचे, असं विधान आफ्रिदीनं केलं. त्याच्या या विधानाला नेटिझन्सनी सडेतोड उत्तर दिले.

40 वर्षीय आफ्रिदीनं सवेरा पाशा या यू ट्यूब कार्यक्रमात विधान केलं की,''भारताविरुद्ध खेळण्याचा आम्ही नेहमी आनंद लुटला. आम्ही त्यांना अनेकदा पराभूत केलं आहे. आम्ही त्यांना एवढा वेळा हरवलं आहे की, सामन्यानंतर भारतीय खेळाडू आमच्याकडे क्षमा मागायचे.''  


याच कार्यक्रमात आफ्रिदीनं भारताविरुद्धच्या 141 धावांच्या खेळीला सर्वोत्तम गुण दिले. तो म्हणाला,''चेन्नईत 1999मध्ये भारताविरुद्धची 141 धावांची खेळी माझ्यासाठी अविस्मरणीय आहे. मी त्या दौऱ्यावर जाणार नव्हतो. वसीम भाई आणि  निवड समिती प्रमुख यांनी मला पाठींबा दिला. तो दौरा आव्हानात्मक होता आणि त्यामुळे त्या खेळीचं महत्त्व खूप आहे.''
आफ्रिदीनं 27 कसोटी, 398 वन डे आणि 99 ट्वेंटी-20 सामन्यांत देशाचे प्रतिनिधित्व केले आहे.  

दरम्यान, त्यानं काश्मीर मुद्द्यावरून पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलं होतं.  मागील बुधवारी जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांसोबत जवानांची चकमक सुरू असताना एक घटना घडली.  दहशतवाद्यांकडून अंदाधुंद गोळीबार सुरू असताना एका लहान मुलाला वाचविण्यासाठी सीआरपीएफचा जवान धावला आणि त्याला सुरक्षीत ठिकाणी नेले. दहशतवाद्यांच्या गोळीबारात एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला. त्या मृत व्यक्तीचा तीन वर्षांचा नातू तिथेच होता. आजोबांना जमिनीवर निपचित पडलेले पाहून नातू त्यांना उठवण्याचा प्रयत्न करू लागला. मात्र आजोबा उठत नसल्याचे पाहून तो रडू लागला. दरम्यान दहशतवाद्यांचा गोळीबार सुरूच होता. त्यामुळे त्या लहान मुलाच्या जीवालाही धोका होता.

लहान मुलाचा जीव संकटात असल्याचे पाहून सीआरपीएफचा जवान त्याचा जीव वाचवण्यासाठी धावला. त्या मुलाला एका हातात घेतले आणि सुरक्षित ठिकाणी नेले. या लहान मुलाला घेऊन जात असलेल्या जवानाचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यावरून आफ्रिदीनं काश्मीर मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली. त्यानं लिहिलं की,''आजोबांचं शव आणि शस्त्रधारी जवान यांच्यात हा तीन वर्षांचा मुलगा सापडला. कोणताच फोटो काश्मीरी जनतेचं दुःख सांगू शकत नाही.''  

आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूनं 64 वर्षीय वृद्धाला गाडीनं उडवलं; थरकाप उडवणारा Video व्हायरल!

भारतीय क्रिकेटपटूंना ओळखलंत का? अष्टपैलू खेळाडूनं शेअर केला पहिल्या मुलाखतीचा व्हिडीओ

Web Title: Former Pakistan all-rounder Shahid Afridi has once again made a big claim on Indo-Pak rivalry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.