तीन महिन्यांत दिनेश चंडीमलकडून काढून घेण्यात आले नेतृत्व, आता 'श्रीलंकन आर्मी'त झालाय भरती!

श्रीलंका क्रिकेट संघाचा माजी कर्णदार दिनेश चंडीमल (Dinesh Chandimal)  याने या वर्षाच्या सुरुवातीला श्रीलंका आर्मी वॉलंटियर फोर्स जॉइन केलं होतं.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2021 02:50 PM2021-07-12T14:50:03+5:302021-07-12T14:50:25+5:30

whatsapp join usJoin us
Former Sri Lanka Captain Dinesh Chandimal making good progress in Army   | तीन महिन्यांत दिनेश चंडीमलकडून काढून घेण्यात आले नेतृत्व, आता 'श्रीलंकन आर्मी'त झालाय भरती!

तीन महिन्यांत दिनेश चंडीमलकडून काढून घेण्यात आले नेतृत्व, आता 'श्रीलंकन आर्मी'त झालाय भरती!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

श्रीलंका क्रिकेट संघाचा माजी कर्णदार दिनेश चंडीमल (Dinesh Chandimal)  याने या वर्षाच्या सुरुवातीला श्रीलंका आर्मी वॉलंटियर फोर्स जॉइन केलं होतं. श्रीलंकेच्या संघातून वगळल्यानंतर चंडीमल आर्मी क्रिकेट संघाकडून खेळण्यासाठी प्रस्ताव मान्य केला होता आणि तो हे काम खूप चांगल्या पद्घतीनं पार पाडत आहे.

दिनेशला याचवर्षी जानेवारीत श्रीलंका कसोटी संघाचे कर्णधारपद दिले होते, परंतु तीन महिन्यातच त्याच्याकडून ही जबाबदारी काढून घेतली गेली. त्यानंतर त्याला संघातूनही वगळले गेले. आता तो श्रीलंका आर्मी वॉलंटियर फोर्समध्ये असून तेथे त्याची प्रगती उल्लेखनीय होत आहे. कोंलबोपासून १०० किमी दूर असलेल्या कंरेदनिया येथे असलेल्या क्रिकेट मैदानाचे निरिक्षक करताना दिनेशला पाहिले गेले. आर्मीत मेजर रँक असलेला दिनेश वर्दीत चांगला दिसतोय.  

 

Web Title: Former Sri Lanka Captain Dinesh Chandimal making good progress in Army  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.