झिम्बाव्बे संघाचा माजी कर्णधार व प्रशिक्षक हिथ स्ट्रिक ( Heath Streak) याच्यावर आयसीसीनं कडक कारवाई केली आहे. हिथ स्ट्रिकवर भ्रष्टाचाराचे आरोप करताना आयसीसीनं त्याला आठ वर्षांच्या बंदीची शिक्षा सुनावली आहे. २०१७ व २०१८ या कार्यकाळात झिम्बाब्वेचा दिग्गज खेळाडू स्ट्रिक यानं प्रशिक्षकपदावर असताना आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांसह आयपीएल, बांगलादेश प्रीमिअर लीग आणि अफगाणिस्तान प्रीमिअर लीगमधील काही सामन्यांची माहितीचा गैरवापर केल्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. तो कोलकाता नाईट रायडर्सचा गोलंदाज प्रशिक्षक होता. IPL 2021: पर्यावरण स्नेही रोहित शर्मा; KKRविरुद्धच्या सामन्यात पुन्हा एकदा हिटमॅनच्या बुटांची चर्चा!
स्ट्रीक यांनी २०१८च्या झिम्बाब्वे, बांगलादेश व श्रीलंका, झिम्बाब्वे विरुद्ध अफगाणिस्तान, आयपीएल २०१८ व अफगाणिस्तान प्रीमिअर लीग २०१८मधील काही सामन्यांची माहिती चुकीच्या व्यक्तिंना दिल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. स्ट्रीक यांनी हे सर्व आरोप मान्य केले आहेत आणि शिक्षाही मान्य केली आहे. २८ मार्च २०२९ पर्यंत त्याला कोणत्याही प्रकारे या खेळाशी संबंध ठेवता येणार नाही. IPL 2021 : दिल्ली कॅपिटल्सचा आणखी एक गोलंदाज कोरोना पॉझिटिव्ह; MIच्या सलामीवीरासोबत केला होता प्रवास
आयसीसीचे सरचिटणीस अॅलेक्स मार्शल यांनी सांगितले की,''हिथ स्ट्रिक हा अनुभवी आंतरराष्ट्रीय खेळाडू व राष्ट्रीय संघाचा प्रशिक्षक आहे. त्यानं आयसीसीच्या अनेक भ्रष्टाचारविरोधी शिक्षणवर्गात सहभाग घेतला आहे आणि त्यामुळे त्याला जबाबदारीची पूर्ण जाण होती. तरीही त्यानं अेकदा नियमांचं उल्लंघन केलं आहे आणि फिक्सिंगसाठी अन्य खेळाडूंशी संपर्क केला आहे. पण, त्याच्या या प्रयत्नांचा कोणत्याच सामन्याच्या निकालावर परिणाम झालेला नाही. त्यानं त्याची चूक मान्य केली आहे.''
Web Title: Former Zimbabwe captain and coach Heath Streak banned for eight years for breaching ICC's anti-corruption code
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.