India vs England : भारत-इंग्लंड चौथ्या कसोटीत टीम इंडियानं १७१ धावांची आघाडी घेताना सामन्यावर पकड घेतली आहे. भारताच्या हातात ७ विकेट्स आहेत आणि आजचा संपूर्ण दिवस खेळून इंग्लंडसमोर तगडे आव्हान उभे करण्याचे लक्ष्य टीम इंडियाचे आहेत. पण, सर्वकाही टीम इंडियाच्या बाजूनं असताना एक मोठी बातमी येऊन धडकली आहे. टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर बीसीसीआयच्या वैद्यकिय टीमनं गोलंदाज प्रशिक्षक भरत अरूण, क्षेत्ररक्षक प्रशिक्षक आर श्रीधर आणि फिजिओथेरपिस्ट नितीन पटेल या चौघांना विलगिकरणात राहण्याचा सल्ला दिला आहे. काल रात्री रवी शास्त्री यांची चाचणी झाली आणि त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. ( The BCCI Medical Team has isolated Mr Ravi Shastri, Head Coach, Mr B. Arun, Bowling Coach, Mr R. Sridhar, Fielding Coach and Mr Nitin Patel, Physiotherapist as a precautionary measure after Mr Shastri’s lateral flow test returned positive last evening.)
या सर्वांची RT-PCR चाचणी केली जाणार आहे आणि तोपर्यंत ही सर्व हॉटेलमध्येच राहतील आणि टीम इंडियासोबत ते प्रवास करणार नाही. भारतीय संघातील अन्य सदस्यांच्या दोन चाचण्या झाल्या. त्यात सर्वांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे आजच्या चौथ्या दिवसाचा खेळ होईल. Day 4 will go ahead as all Indian players tested negative.!
टीम इंडियाची गाडी सेट झालीय असं वाटत असताना इंग्लंडच्या ऑली रॉबिन्सन यानं कमाल केली. रोहित शर्मा व चेतेश्वर पुजारा यांनी दुसऱ्या विकेटसाठी २७८ चेंडूंत १५३ धावांची भागीदारी करताना विक्रम केला. टीम इंडिया मोठ्या आघाडीच्या दिशेनं कूच करत आहेत, असे दिसत असतानाच इंग्लंडनं मोठे धक्के दिले. रोहित व चेतेश्वर पुजारा एकाच षटकात माघारी परतल्यानं टीम इंडियाची नवी जोडी मैदानावर आहे. याही डावात रवींद्र जडेजाला पाचव्या क्रमांकावर अजिंक्य रहाणेच्या जागी बढती दिली गेली. अंधुक प्रकाशामुळे तिसऱ्या दिवसाचा खेळ १३ षटकं आधीच थांबवण्यात आला होता.
कर्णधार विराट कोहली व रवींद्र जडेजा खेळपट्टीवर आहेत. विराटनं ३७ चेंडूंत नाबाद २२ धावा केल्या आहेत. भारतानं तिसऱ्या दिवसअखेर ३ बाद २७० धावा करून १७१ धावांची आघाडी घेतली होती.
Web Title: Four members of Team India Support Staff to remain in isolation including Ravi Shastri
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.