Indian Premier League 2021 : महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) हा आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. त्याच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सनं ( Chennai Super Kings) अनेक विक्रम केले आहेत. आयपीएल २०२०त CSKला साजेशी कामगिरी करता आलेली नाही आणि इतिहासात प्रथमच धोनीचा संघ प्ले ऑफसाठी पात्र ठरला नाही. धोनीनं यूएईत झालेल्या आयपीएलमध्ये १४ सामन्यांत २०० धावा केल्या. १३ वर्षांच्या इतिहासातील ही त्याची सर्वात निचांक कामगिरी ठरली. पण, हे अपयश मागे टाकून महेंद्रसिंग धोनीआयपीएल २०२१ गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे. आयपीएल फ्रँचायझींसाठी नसेल नाईट कर्फ्यू; महाराष्ट्र सरकारनं दिली सूट!
आयपीएलमध्ये धोनीच्या नावावर असलेले विक्रम ( Here are the records that MS Dhoni holds in the IPL)
- आयपीएलमध्ये सर्वाधिक २०४ सामने
- RCBविरुद्ध सर्वाधिक ८३२ धावांचा विक्रम
- आयपीएलमध्ये सर्वाधिक २०९ षटकार मारणारा भारतीय फलंदाज
- आयपीएलमध्ये १०० विजय मिळवणारा एकमेव कर्णधार
- ६ एप्रिल २०१३ ते १४ एप्रिल २०१९ या कालावधीत धोनीनं सलग ८५ सामन्यांत नेतृत्व सांभाळले आणि गौतम गंभीरनंतर ( १०७) ही दुसरी सर्वोत्तम कामगिरी आहे.
- डेथ ओव्हरमध्ये ( १७ ते २० षटकं) सर्वाधिक १४१ षटकारांचा विक्रम
आयपीएल २०२१मध्ये कोणते विक्रम खुणावतायेत ( Milestones/records Dhoni can achieve in IPL 2021)
- दोन बळी आणि आयपीएलमधील धोनीच्या नावावरील बळींचे दीडशतक पूर्ण. असा विक्रम करणारा पहिला यष्टिरक्षक
- १७९ धावा करताच तो ट्वेंटी-२०त ७००० धावांचा पल्ला गाठेल
- १४ षटकार अन् चेन्नई सुपर किंग्सकडून आयपीएलमध्ये षटकारांचे द्विशतक पूर्ण
Web Title: Full list of records CSK captain MS Dhoni; he is eyes three huge milestones in IPL 2021
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.