टीम इंडियाचा सर्वोत्तम कर्णधार कोण, ही चर्चा वारंवार केली जाते. याचे प्रत्येकाकडे वेगवेगळे उत्तर आहे. पण, या शर्यातीत सौरव गांगुली, महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली ही नावं वारंवार पुढे येतात. पण, भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरचं उत्तर वेगळंच आहे. त्याच्यामते गांगुली, धोनी आणि विराट हे नाही, तर भारताचा 'हा' खेळाडू भारताचा सर्वोत्तम कर्णधार आहे.
स्टार खेळाडूच्या पत्नीनं कोरोनाबाबत चुकीची माहिती केली पोस्ट, अन्...
संघात निवड झाली नाही, म्हणून रात्रभर रडला होता Virat Kohli!
सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली गंभीरनं टीम इंडियात पदार्पण केले होते. तो 13 वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत राहुल द्रविड, अनिल कुंबळे, महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली यांच्या नेतृत्वाखाली खेळला. धोनीच्या नेतृत्वाखाली गंभीर दोन ( 2007 आणि 2011) वर्ल्ड कप विजेत्या संघांचा सदस्य होता. गंभीरनं 2018मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.
गंभीरनं सर्वोत्तम कर्णधार म्हणून अनिल कुंबळेची निवड केली आहे. पण, विक्रमानुसार धोनीला हा मान देईन, असेही गंभीर म्हणाला. ''सौरव गांगुलीची कामगिरी दमदार आहे. पण, अनिल कुंबळेला सर्वाधिक काळ कर्णधार झालेलं पाहायला आवडलं असतं. कुंबळेच्या नेतृत्वाखाली मी केवळ सहा कसोटी सामने खेळलो. कुंबळेला दीर्घ काळ कर्णधारपदाची जबाबदारी दिली असती, तर त्याने अनेक विक्रम मोडले असते. 2007मध्ये त्याच्याकडे नेतृत्व सोपवण्यात आले आणि तेव्हा त्याच्या कारकिर्दीला 17 वर्ष झाली होती,'' असे गंभीर म्हणाला.
कसोटी आणि वन डे क्रिकेटमध्ये कुंबळे हा भारताचा सर्वात यशस्वी गोलंदाज आहे. त्यानं कसोटीत 619 आणि वन डेत 337 विकेट्स घेतले. कुंबळेनं 14कसोटी सामन्यांत टीम इंडियाचे नेतृत्व सांभाळले आणि त्यापैकी तीन कसोटी जिंकल्या. पाच सामने अनिर्णीत राहीले आणि 6 सामन्यांत पराभव झाला.
Web Title: Gautam Gambhir picks best captain he played under svg
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.